Girish Mahajan & Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut : सहा खासदार फुटले, संजय राऊतांनी सगळा राग गिरीश महाजनांवर काढला.. बोलताना जीभ घसरली

Sanjay Raut On Girish Mahajan : ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन व संजय राऊत यांच्यात शाब्दिक वॉर रंगल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत यांची टीका करताना जीभ घसरली.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटाने राबवलेल्या ऑपरेशन टायगर अंतर्गत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील सहा खासदार फुटल्याने उबाठात तीव्र संतापाचे वातावरण आहे. त्यावर संजय राऊत यांनी राडा करण्याचं आव्हान केलं आहे. मात्र, यावर भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी बोचऱ्या शब्दात टीका केली. त्यावर संजय राऊत यांनीही गिरीश महाजन यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.

उबाठाकडे राडा करायला देखील कोणी शिल्लक राहिलेलं नाही असा टोला गिरीश महाजन यांनी हाणला. महाजन म्हणाले ते दिवस गेले, जेव्हा तुम्ही आमच्यासोबत होता. ते दिवस आता राहिले नाही. आता तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसला आहात. राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवा म्हणून मागे-मागे फिरता अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

ठाकरे गट संपवायला संजय राऊत हे पुरेसे असल्याचे महाजन म्हणाले. लोकांना वाऱ्यावर सोडल्याने लोकच ठाकरे गटात राहायला तयार नाहीत. त्यांना आमदारही वैतागले आहेत. मुंबईतील नगरेसवक सुद्धा जय महाराष्ट्र करतील असं महाजन म्हणाले.

गिरीश महाजनांच्या या वक्तव्याने दुखावलेल्या संजय राऊतांचा चांगलाच संताप झाला. त्यांनी माध्यमांशी बोलताना खासदार फुटीचा सगळा राग मंत्री गिरीश महाजन यांच्यावर काढला. महाजन यांच्यावर टीका करताना राऊत यांची जीभ घसरली. एक मंत्री आहेत, लोकं त्यांना बायले म्हणतात, असं गिरीश महाजन यांना उद्देशून राऊत म्हणाले.

गद्दारांशी नाही लडायचं तर कोणाशी लढायचं? गद्दारांना कोणती भाषा वापरायची हे महाजनांनी सांगावं असा सवाल राऊतांनी विचारला. आमच्याकडे राडा करण्याची क्षमता नाही असं महाजन म्हणतात मग गद्दारांना सुरक्षा कशासाठी देतात? तुमचा बॉस एकनाथ शिंदे ५० गाड्यांचा ताफा घेऊन फिरतो, कुणापासून भीती आहे? त्यांचे चिरंजीव बघा त्यांची सुरक्षा व्यवस्था बघा, मला त्यात पडायचं नाही. तुम्हाला जर खऱ्या शिवसेनेची भीती नाही मग इतकी सुरक्षा कशासाठी असा सवाल राऊत यांनी केला.

खाकी वर्दीची जी भीती तुम्ही आम्हाला दाखवत आहात. ED, CBI ची मस्ती दाखवत आहात. लोक कसे फुटतात हे गिरीश महाजन सांगत आहेत. एक दिवस ED आणि CBI जर माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी या गिरीश महाजन यांनाच फोडून दाखवेन असं राऊत म्हणाले. हा स्वत:ला काय समजतो, नाशिकच्या कुंभमेळ्यात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाने सर्वात मोठा भ्रष्टाचार चालू असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

गिरीश महाजन तुम्ही केवळ काँग्रेसमुळे स्वातंत्र्य भोगत आहे. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य दिलं. देशासाठी त्याग केला. त्यांनी स्वातंत्र्याची चळवळ उभी केली. तुम्ही काय केलं? असा सवालच संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांना विचारला. तुमची गद्दार मुव्हमेंट आहे. पोलीस बाजूला ठेवून या. मग राडा काय असतो हे सागंतो, चिंधी नाय उरणार अंगावर. गिरीश महाजन तर 15 मिनिटात फुटतील, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला. संघाची आयडॉलॉजी आम्हाला सांगू नका असं राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT