Girish Mahajan Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut news : संजय राऊत यांचा गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले, खड्डे बुजवता येत नाहीत, ते काय कुंभमेळा करणार?

Sanjay Raut news, Girish Mahajan, Nashik potholes, Nashik roads : नाशिकमधील खड्ड्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक; महापालिकेविरोधात आक्रोश मोर्चा, कुंभमेळा तयारीवरही प्रश्नचिन्ह.

Sampat Devgire

Shivsena UBT News : नाशिक शहरातील खड्डे हा गंभीर मुद्दा बनत चालला आहे. विरोधकांना आयतेच कोलीत मिळाल्याने राजकारण तापलं असून सत्ताधारी बॅकफूटवर गेले आहेत. सिंहस्थ कुंभमेळा रस्ते विकासाची कामे सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका आणि राज्य शासनाची धावपळ सुरू आहे.

रस्त्यांचे कामे सुरू असल्याने अनेक भागात रस्ते वाहतूक वळविण्यात आली आहे. पावसाची भर पडल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहेत. त्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महापालिकेविरोधात सोमवारी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. महापालिकेने या पार्श्वभूमीवर शहरातील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत जवळपास १५ हजार खड्डे बुजविण्यात आले आहेत.

महापौर हिमगौरी आडके यांनी शिवसेना यूबीटी पक्षाला चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. शिवसेना नेते खासदार राऊत यांनी मात्र महापालिका आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवू शकत नाहीत, ते सिंहस्थ कुंभमेळा कसा करणार? या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष महापालिकेला जाब विचारेल, असे ते म्हणाले.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून खासदार राऊत आणि संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी कंबर कसली आहे. उद्या शिवसेना कार्यालयापासून महापालिकेच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल. दरम्यान, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील खड्डे आणि रस्त्यांची दुरावस्था यावर तातडीने कारवाई करण्याचा सूचना यापूर्वीच दिले आहेत. त्यासाठी प्रशासनाची बैठक घेण्यात आली.

खासदार राऊत यांनी आंदोलन करून दाखवावेच, असे आव्हान देखील महाजन यांनी विरोधकांना दिले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार राऊत रविवारी नाशिक शहरात येत आहेत. त्यामुळे महापालिकेचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी अलर्ट झाले आहेत. सोमवारी महापालिके विरोधात निघणारा मोर्चा यशस्वी करण्याचे आव्हान स्थानिक पदाधिकाऱ्यांपुढे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT