

TMC leader death : पश्चिम बंगालमधील घटनेने रविवारी देश हादरून गेला. विधानसभेचे माजी उपसभापती आणि पाच टर्म आमदार राहिलेल्या आशिष बॅनर्जी यांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपविले आहे. रविवारी सकाळी त्यांच्या कार्यालयात त्यांचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून पोलिसांकडून याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
आशिष बॅनर्जी हे माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जात होते. तृणमूलची सत्ता असताना ते विधानसभेचे उपसभापती होते काही महिन्यांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. पाचवेळा आमदार राहिलेल्या बॅनर्जी यांनी पक्षात झालेल्या बंडानंतर ममतांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये आशिष बॅनर्जी यांनी आपल्या मृत्यूबद्दल कुणीही दोषी नसल्याचे म्हटले आहे. तसेच आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोपही त्यांनी फेटाळून लावले आहेत. ते TRDA चे अध्यक्ष होते. त्यांनी म्हटले आहे की, तारापीठ रामपुरहाट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (TRDA) मध्ये आपल्याकडे साडे तीन वर्षे कुठलीही फाईल देण्यात आली नाही. आपण ना टेंडर कमिटीमध्ये होतो ना धनादेशावर सही करण्याचा अधिकार होता.
कोणत्याही आराखड्याला मंजुरी दिली नाही, एनओसी जारी केली नाही. अनुदानही दिले नाही. या प्रकरणांमध्ये आपल्याशी कधीच कुठली चर्चा झाली नाही. या कामांमध्ये माझी कुठलीच भूमिका नव्हती. आपण कधीची भ्रष्टाचार केला नाही. विद्यापीठापासून राजकीय जीवनात कधीही अवैध संपत्ती कमविली नाही. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले. कोणत्याही घोटाळ्यात आपण सहभागी नव्हतो, असे बॅनर्जी यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठी नमूद करण्यात आले आहे.
राजकारण येणे ही आपली चूक होती, असेही त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. त्यांनी आपला कुटुंबातील पुढील पिढीने राजकारणात येऊ नये, असा सल्लाही दिला आहे. दरम्यान बॅनर्जी यांच्या मृत्यूमुळे तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ते ममतादीदींचे विश्वास सहकारी मानले जात होते. बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाट विधानसभा मतदारसंघातून ते २००१ ते २०२१ या कालावधीत सलग पाचवेळा निवडून आले होते. यावर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ध्रुबा साहा यांनी त्यांचा पराभव केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.