Narendra Modi, Amit Shah, Sanjay Raut  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut : गुजरातच्या दोन व्यापार्‍यांची औरंगजेबी वृत्ती; राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

Pradeep Pendhare

Shivsena UBT : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नगरमध्ये येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले. "मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची असून, महाराष्ट्राच्या हातात भिकेचा कटोरा देण्याचे कटकारस्थान हे दोन गुजरातचे औरंगजेब वृत्तीचे व्यापारी करत आहेत. औरंगजेब गुजरातमध्ये जन्मला आहे. म्हणून ते आपल्याशी, महाराष्ट्राशी औरंगजेबी वृत्तीने वागत आहेत", असे खळबळजनक विधान संजय राऊत यांनी केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी नगरमध्ये सभा झाली. या सभेत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर गंभीर आरोप केले.

खासदार राऊत म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश लुटला, महाराष्ट्र लुटला. महाराष्ट्राला भिकेला लावण्याचे कारस्थान करत आहे. मुंबई महाराष्ट्राची वैभवशाली राजधानी. मुंबईच्या रक्षणासाठी, मराठी माणसांसाठी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. ही मुंबई लुटायची आणि तोडायची असेल, तर सगळ्यात अगोदर शिवसेना तोडली.

त्यानंतर शरद पवार यांचे नेतृत्व संपवले. हे त्यांचे कारस्थान आहे. पण नरेंद्र मोदींचे 100 बाप जरी उतरले. मुंबई आणि महाराष्ट्राला हात लागू शकत नाही. मुंबईसह महाराष्ट्रातील उद्योग नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी गुजरातमध्ये पळवले. महाराष्ट्राच्या हातात यांना भिकेचा कटोरा देण्याचे कारस्थान आहे. कारण यांचा महाराष्ट्रावर राग आहे. सूड घ्यायचा या दोन गुजरात्यांना आहे".

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबई हिसकावून घ्यायची आहे. मुंबई आणि महाराष्ट्रावर हे गुजराती व्यापारी हल्ला का करत आहे, हे इतिहासात जाऊन पाहायला पाहिजे. असे हल्ले मोगलांच्या काळात व्हायचे. औरंगजेब, अफलखान, निजामशहाचे हल्ले व्हायचा. औरंगजेब 27 वर्षे महाराष्ट्रात लढत राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला. म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे.

औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे. त्यामुळे ती माती आहे, ती औरंगजेबाची माती आहे. त्या मातीतील हे दोन व्यापारी आहे. औरंगाजेबाचा जन्म नरेंद्र मोदीच्या गावात झाला आहे. अहमदाबादच्या बाजूला दावत नावाचे गाव आहे. औरंगजेब तिथे जन्माला आहे.

म्हणून ते आपल्याशी औरंगजेबी वृत्ती वागत आहेत. पण लक्षात घ्या. एका औरंगजेबाला आम्ही महाराष्ट्रात गाठला आहे. त्याची कबर खांदली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी "तूम कौन हो". तुमची जेवढे अंगावर याल', तेवढे आम्ही उसळून उठू, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.

भाजपने गोमांस कंपनीकडून पैसे घेतले

खासदार संजय राऊत म्हणाले, "मोदी ब्रॅण्ड संपला आहे. भाजपवाले म्हणतात, मोदीला भाषणाला आणू नका. हे राम मंदिरात गेले. त्यांना आता मते मिळत नाही. दहा मिनिटे पूजा केली. नगरमध्ये येऊन हिंदू-मुसलमान केले. भाजपच्या बँक खात्यात साडेपाचशे कोटी रुपये कोठून आले.

हिंदुत्ववादी समजता ना स्वतःला. गोमांस निर्यात करणार्‍या कंपन्यांकडून भाजपने निवडणूक लढवण्यासाठी साडेपाचशे कोटी रुपये घेतले. गोमातेसाठी 'मॉब लिंचिग', अनेकांवर हल्ले केले. हे यांचे ढोंगी हिंदुत्व.

आम्हाला हिंदुत्व शिकवताय. नरेंद्र मोदी एक नंबरचा ढोंगी आणि खोटारडा माणूस आहे. देशात मी पहिला माणूस आहे, त्यांना खोटारडा म्हणालो. त्यानंतर राहुल गांधी त्यांना खोटारडे म्हणायला सुरूवात केली".

भाजपने तीन-तीन नवरे केले, तरी 'विकास' होईना

खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका करताना भाजपने तीन-तीन नवरे केले, तरी विकास होईना, असा टोला लगावला. "नरेंद्र मोदी नगरमध्ये येऊन गेले. ते आले काय, गेले काय, काहीही फरक पडत नाही. देशाने ठरवले आहे, चार जूनला मोदींना डिसमिस करायचे आहे.

ज्या विराट सभा सुरू आहे, ती अंतिम विदाई आहे. देशावर, विकासावर मोदी बोलत नाहीत. विकासासाठी यांना दुसर्‍यांची पोरं लागतात. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फौजदाराचा शिपाई केला. विकास होत नाही म्हणून अगोदर नागपूरचा नवरा केला.

त्याच्याकडून काही होईना म्हणून ठाण्याचा केला. तोही फेल गेला. म्हणून आता बारामतीचा केला. आतातरी 'विकास' पैदा होतो, ते तरी बघू. तीन-तीन नवरे केले भाजपने. तीन नवरे करून सुद्धा विकास पैदा होत नाही आणि देशाच्या विकासाच्या गोष्टी करतात. महाराष्ट्र लुटत आहे", असा घाणाघात खासदार संजय राऊत यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT