Pune News : भविष्यात देशातील प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वर्तवली आहे. परिणामी पवार यांच्या या भाकितामुळे राजकीय चर्चेला तोंड फुटले नसते तरच नवल.
त्याचवेळी आता भविष्यात पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का? अन्य कोणते प्रादेशिक काँग्रेसशी हातमिळवणी करतील, याचीही चर्चा आत्तापासून राज्याच्या आणि पर्यायानं देशाच्या राजकारणात सुरु झाली आहे. यावर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
अजित पवार म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी काय भूमिका घ्यावी आणि काय निर्णय घ्यावा हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. ते त्यांच्या मनाला वाटतील त्याच गोष्टी करत असतात. आत्ता आमची भूमिका वेगळी आहे. मात्र कधी कधी संभ्रम अवस्था निर्माण करण्यासाठी अशी स्टेटमेंट करण्यात येतात.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"ठाकरे (Uddhav Thackeray) काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करतील असं वाटत नाही. मी अडीच वर्षे त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहिलं आहे. एकंदरीत ते असा काही निर्णय घेण्याची शक्यता नाहीच. मी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना त्यांना जवळून पाहिलं आहे. स्वभाव आणि त्यांची कामाची पद्धत पाहता ते आपला पक्ष विलीन करतील," अशी शक्यता मला वाटत नसल्याचं अजित पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.