Sanjay Raut, Amit Shah & Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut Politics: भाजप २०२४ नंतर अजित पवारांचा काटा काढणार, नंतर मुख्यमंत्र्यांचा नंबर!

Sampat Devgire

Raut On Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा आज नाशिकला निवडणूक आढावा बैठक घेणार आहेत. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हे देखील आज नाशिक दौऱ्यावर आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार राऊत यांनी अमित शाह यांच्यावर खरमरीत टीका केली शाह आले मग मुख्यमंत्री त्यांच्या स्वागताला जाणार, कारण ते त्यांचे गॉड फादर आहेत. त्यांच्यामुळेच सरकार आले आहे. मुख्यमंत्री पदावर शिंदे यांना शाह यांनीच बसवले.

त्यामुळे शाह यांच्यासाठी मुख्यमंत्त्र्यांना अनेक करामती कराव्या लागल्या. मात्र २०२४ ची विधानसभा निवडणुक झाल्यावर या सगळ्यांचा काटा काढला जाणार आहे. भाजप सगळ्यात आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काटा काढील. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या चाळीस चोरांचा हिशोब होईल.

मुख्यमंत्री चार तास जरी अमित शहा यांच्या बैठकीला बसले आणि कितीही पुढे पुढे केले तरी त्यांचा कार्यक्रम अटळ आहे, असा दावा राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. महायुतीत तेढ निर्माण होईल की नाही, हे मला माहीत नाही, असे देखील ते म्हणाले.

वापरा आणि फेका ही भाजपची नीती आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. आजवरचा त्यांचा इतिहास हेच सांगतो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक संपल्यावर शिंदे यांच्या किंवा अन्य कुणाच्या दाढीने अनेकांचे गळे कापले जातील.

केसाने गळे कापण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. ही प्रक्रिया होईल, हे शंभर टक्के सत्य आहे. त्यापासून या लोकांना कोणीही वाचवू शकणार नाही. असा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री अत्यंत लाचार आहेत. या लाचारीमुळे ते दिल्ली पुढे जाऊन कटोरे हाती घेतात. एवढी लाचारी महाराष्ट्राच्या इतिहासात कधी पाहायला मिळाली नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला. भाजप नेते शाह यांच्या दौऱ्याने राज्यात काहीही बदल होण्याची स्थिती नाही. भाजपला काहीच फायदा होणार नाही.

भाजप नेते शाह काय किंवा अगदी शाह यांचा मुलगा आला तरीसुद्धा मुख्यमंत्री त्याच्या स्वागताला जातील. लाचार लोचट आणि स्वाभिमान शून्य सरकार सत्तेत बसवण्यासाठी त्यांनी त्यांच्यावर उपकार केले आहेत. त्यामुळे ते स्वागताला हजर राहणारच.

मुख्यमंत्री दिल्लीची किती चाटूगिरी करताय, हे जनतेला दिसते आहे. असे कधीही घडले नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राने अशी चाटूगिरी कधीच केली नव्हती, या शब्दात आपला संताप त्यांनी व्यक्त केला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT