Sharad Pawar : नगरच्या राजकारणात मोठा भूकंप ! शरद पवारांचा फडणवीसांना पुन्हा 'दे धक्का'! पिचड पिता-पुत्राची 'घरवापसी'?

Madhukarrao Pichad and Vaibhav Pichad met Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात शरद पवार राजकीय भूकंप घडवून आणण्याच्या तयारीत आहे. या भूकंपाची सर्वाधिक झळ भाजपला बसणार आहे. भाजपमध्ये स्थिरावलेले नेते माजी मंत्री मधुकराव पिचड आणि त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

या तिघांची बंद दाराआड तब्बल अर्धातास चर्चा झाली. ही चर्चा नेमकी काय झाली, यावर अधिक खुलासा होऊ शकला नसला, तरी पिचड पिता-पुत्राची घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे. याचबरोबर भाजपचं नगर जिल्ह्यातील गणित फिस्कटणार, असं बेरजेचं राजकारण शरद पवार यांनी सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाची नगर जिल्ह्यात उद्या गुरूवारपासून शिवस्वराज्य यात्रा सुरू होत आहे. या यात्रेला अकोले इथून सुरवात होत आहे. पिचड यांच्या बालेकिल्ल्यातून ही यात्रेतून सुरवात होत आहे. तत्पूर्वीच शरद पवार यांची पिचड पिता-पुत्रानी भेट घेतली. त्यामुळं नगर जिल्ह्यातील राजकीय घडामोंडीना वेग आला आहे. शिवस्वराज्य यात्रेनं पहिला धक्का भाजपला दिला असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.

Sharad Pawar
Shiv Swarajya Yatra Ahmednagar : NCP शरदचंद्र पवार पक्षाचे शक्तीप्रदर्शन; शिवसेनेच्या जागेसह सहा मतदारसंघावर दावा

सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार यांच्यासोबत पिचड पिता-पुत्राची अर्धा तास चर्चा झाली. भाजपमध्ये (BJP) स्थिरावलेले पिचड पिता-पुत्रानी शरद पवारांची भेट विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतल्याने भाजपचं गणित अकोले विधानसभासह राज्यातील आदिवासी मतदारांमध्ये बिघडू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पिचड पिता-पुत्राचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाल्यास भाजपचं आदिवासी मत पेटीवर मोठा परिणाम होईल, असे सांगितलं जात आहे.

Sharad Pawar
Nitesh Rane : आमदार राणेंच्या अडचणी वाढल्या; सात गुन्ह्यांच्या तपासाला वेग येणार

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पिचड पिता-पुत्रानी भाजपला साथ दिली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण ताकद लावून तिथं शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले डाॅ. किरण लहामटेंना पिचडांविरोधात निवडून आणले. राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवार महायुती भाजप सरकारमध्ये सहभागी झाले. त्यावेळी आमदार लहामटेंनी अजित पवार यांची साथ केली.

महायुतीत ही जागा आता राष्ट्रवादी काँग्रेसला सुटत आहे. त्यामुळे पिचड यांची राजकीय कोंडी झाली होती. ही कोंडी दूर करण्यासाठी पिचड पिता-पुत्राची पवारांशी झालेली भेट बरच काही सांगून झाले. एकप्रकारे शरद पवारांसाठी पिचड पिता-पुत्र तुतारी हातात घेणार, असे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com