Eknath Shinde | Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut Politics: संजय राऊत यांचा टोमणा, एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे चिन्ह खिचडी ठेवावे!

Sanjay Raut On Shiv Sena Symbol: मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या भेटीवर राऊत यांची कोपरखळी.

Sampat Devgire

Sanjay Raut on Uday Samant: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीबाबत विविध कयास लावले जात आहेत. त्यामुळे ही भेट राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे.

सध्या राज्यात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्या चर्चेमुळे महायुती अस्वस्थ असल्याचे लपून राहिलेले नाही. विशेषता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याविषयी अतिशय सावध आहेत.

राज ठाकरे आणि सामंत यांच्या बैठकीबाबत शिवसेना प्रवक्ते खासदार राऊत यांनी शिंदे गटाला टोमणा मारला आहे. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या घरी खिचडी तयार होत नसावी. त्यामुळे खिचडीसाठी ते राज ठाकरे यांच्या भेटीला गेले असावेत.

शिवाजी पार्क परिसरात मराठी माणसांची अनेक हॉटेल्स आहेत. चांगल्या प्रकारची खिचडी मिळते. साबुदाण्याची खिचडी ही मिळते आणि तांदळाची खिचडीही मिळते. हवे तर मी त्या हॉटेलची नावे उद्योग मंत्री सामंत यांना सांगेल.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या महायुतीत आहे. भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत ते सत्तेचे सुख भोगत आहेत. असे असताना दुसरीकडे काय सुरू आहे. दुसऱ्यांच्या काय चर्चा सुरू आहेत यामध्ये लक्ष घालण्याची वेळ त्यांच्यावर का आली? असा सूचक प्रश्न त्यांनी केला. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आता आपल्या पक्षाचे निशाणी खिचडी ठेवायला हरकत नाही.

एकनाथ शिंदे हे सातत्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या विरोधात कारवाया करीत असतात. ती त्यांची अपरिहार्यता झाली आहे, असे राऊत यांनी सुनावले. एका वर्षभरातच एकनाथ शिंदे यांची काय अवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांचे भविष्य काय असेल हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही, असेही राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT