MLA Kiran Lahamte Car Accident: मोठी बातमी: अजितदादांच्या लाडक्या आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची समोरासमोर धडक

NCP MLA Kiran Lahamate Accident News : राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे हे मंगळवारी (ता.13) अकोलेहून राजूरकडे जात असतानाच ही अपघाताची घटना घडली. या अपघातानंतर आमदार लहामटे यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Kiran Lahamte Car Accident.jpg
Kiran Lahamte Car Accident.jpgSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहामटे यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि आमदार किरण लहामटे (Kiran Lahamate) यांच्या कारची धडक झाली. या अपघातात सुदैवानं आमदार लहामटे यांना गंभीर दुखापत झालेली नाही.

राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे हे मंगळवारी(ता.13) अकोलेहून राजूरकडे जात असतानाच ही अपघाताची घटना घडली. या अपघातानंतर आमदार लहामटे यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

आमदार लहामटे हे प्राथमिक उपचारानंतर थेट राजूर येथील निवासस्थानी दाखल झाले. राजूरकडे जात असताना ट्रक आणि लहामटे यांच्या कारची समोरासमोर धडक झाल्याची वार्ता समजताच त्यांच्या समर्थकांची मोठी धावपळ झाली. पण या अपघातात लहामटे यांच्या वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे.

Kiran Lahamte Car Accident.jpg
Pimpri BJP News : भाजपचा पिंपरीत प्रस्थापितांना मोठा धक्का? चार आमदारांनी लावली 'फिल्डिंग', पण 'काटें'नी काढली 'विकेट'

अकोले मतदारसंघाचे आमदार असलेले किरण लहामटे यांनी 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. 2019 ला भाजपच्या वैभव पिचड यांना पराभवाचा धक्का देत जायंट किलर ठरले होते.

तर विधानसभा 2024 च्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार किरण लहामटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमित भांगरे यांना पराभवाचा जोर का झटका दिला होता. लहामटे यांनी 73 हजार 958 मते तर अमित भांगरे यांना 68 हजार 402 मते मिळाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com