Sanjay Raut, Uday Samant & Devendra Fadanvis  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut Politics: संजय राऊत यांनी फडणवीस प्रकरणावरून शिंदेंच्या मंत्र्याला दिले थेट आव्हान!

Sanjay Raut; Why Devendra fadnavis not residing official residence of CM 'Varsha'-खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री वर्षा बंगला आणि गुहाटीचा विषय उकरला

Sampat Devgire

Sanjay Raut News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वर्षा बंगला हा विषय चर्चेत आला आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी उत्तर दिले होते. त्यामुळे आता या विषयावरून शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यालाच आव्हान दिले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस वर्षा या बंगल्यावर राहायला का? येत नाहीत, असा प्रश्न त्यांनी केला आहे. त्याचा संबंध जादूटोणा आणि ज्योतिष हा तर नाही ना?. असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे पक्षाला डिवचले आहे.

या संदर्भात आज खासदार राऊत यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या गोटात सध्या मी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मोठी चर्चा होत आहे. त्यामुळेच आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते वर्ष बंगल्यावर राहायला का जात नाहीत? हे स्पष्ट केले पाहिजे.

गुवाहाटीला कामाख्या देवीला नवस म्हणून रेडे कापले आणि त्याचे शिंग वर्षा बंगल्याच्या आवारात खोदकाम करून पुरले आहे, असे तेथील स्टाफ आणि कर्मचारी सांगतात. आमचा त्यावर विश्वास नाही. मात्र मंतरलेले शिंग आणले म्हणजे मुख्यमंत्रीपद अन्य कोणाकडे टिकू नये, यासाठी आणले होते का? असा प्रश्न उपस्थित होतो.

खासदार राऊत म्हणाले, आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन विरोधी कायदा पाळणारी माणसे आहोत. त्यामुळे आम्ही हा विषय लावून धरत आहोत. वेगळे काहीहा घडू शकते. ते होऊ नये, म्हणून आम्ही यावर प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री अस्वस्थ आहेत का? किंवा सरकार अस्थीर आहे का? असा प्रश्न आहे.

खासदार राऊत यांना शिवसेना शिंदे पक्षाचे मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले होते. त्याचाही समाचार खासदार राऊत यांनी घेतला. राऊत यांनी मंत्री सामंत यांना थेट आव्हानच दिले आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. फुले, शाहू यांनी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केले आहे. त्यामुळे मंत्री सामंत हे देखील कोकणातील असल्याने त्यांनी `हे` काम करून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.

यानिमित्ताने शिवसेना नेते राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांना डिवचले आहे. त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या मंत्री आणि नेत्यांचाही चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे वर्षा बंगल्याचा विषय काढून त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे समाधान प्राप्त केले आहे, असे म्हणता येईल.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT