Manikro Kokate Politics: धक्कादायक, थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे अकाउंट हॅक!

Digital crime; Agriculture Minister Manikrao Kokate's WhatsApp account hack-पंतप्रधान विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना गंडा घालण्याचा झाला प्रयत्न
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate News: डिजिटल हॅकिंग आणि गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. सामान्य नागरिकांना त्याची सातत्याने झळ बसत आहे. यावर सायबर गुन्हेगारांना आळा घालण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्याचे चित्र आहे.

लोकांना गंडा घालून खिसे भरण्यासाठी सायबर गुन्हेगार विविध प्रयोग करत आहेत. आता त्याची झळ थेट राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना बसली आहे. माणिकराव कोकाटे यांचे अकाउंट सायबर भामट्यांनी हॅक केल्याचे उघड झाले आहे.

Manikrao Kokate
Eknath Shinde Politics: काय चालललय काय? मतदारांपेक्षा महायुतीतील पक्षांचे सदस्य अधिक!

यासंदर्भात स्वतः कृषिमंत्री कोकाटे यांनीच खुलासा केला आहे. पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी अकाउंट उघडण्याचे आवाहन ह्या केलेल्या अकाउंट वरून करण्यात येत होते. त्याद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची मोठी शक्यता होती. मात्र वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने कृषी मंत्री कोकाटे यांनी याबाबत स्वतः पुढे येऊन आवाहन केले आहे.

Manikrao Kokate
Dada Bhuse Politics: दादा भुसे संतापले, म्हणाले, 'ते' संजय राऊत यांना चांगले ठाऊक!

कोणीही या हॅक झालेल्या व्हाट्सअप अकाउंट द्वारे आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊ नये, असे कृषिमंत्री कोकाटे यांनी सांगितले आहे. माझे व्हाट्सअप अकाउंट हॅक झाल्याचा निरोप त्यांनी सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या दरम्यान काही लोकांना गंडा घालण्यात सायबर भामटे यशस्वी तर झाले नाही ना? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

यापूर्वी विविध मंत्री आणि राजकीय नेत्यांचे अकाउंट हॅक झाल्याचे प्रकार पुढे आले आहेत. हे लक्षात घेऊन सायबर यंत्रणा सजग आहेत. या संदर्भात विविध माध्यमांतून सातत्याने नागरिकांना बनावट कॉल्स आणि फेक अकाउंट वरून होणारी पैशाची मागणी आणि डिजिटल अटक याबाबत प्रतिसाद देऊ नये, असे सांगितले जात आहे.

दरम्यान याबाबत कृषिमंत्री कोकाटे यांनी झालेल्या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या संदर्भात पोलिस नियंत्रण कक्षाला देखील माहिती दिली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देखील अकाउंट हॅक झाल्याबाबत विविध यंत्रणांकडून माहिती संकलित केली जात आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com