Devendra Fadanvis & Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut Politics: संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले, ‘दंगलखोरांची बाजू घेऊ नका’

Sanjay Raut;Devendra Fadnavis should understand freedom of expression-स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणावरून संजय राऊत यांनी फडणवीसांना डिवचले

Sampat Devgire

Sanjay Raut News: स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरण सध्या राजकारणात चांगलेच हॉट बनले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष कामरा याच्या बाजूने आहे. भाजपने मात्र एकनाथ शिंदे यांची बाजू घेतली आहे. त्यावरून राजकारण तापले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग सहन केला जाणार नाही, असे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा यांनी केलेल्या टिकात्मक कवितेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले.

खासदार संजय राऊत यांनी गुवाहाटीला पळून गेलेले गद्दार नव्हते का?. हा गद्दारीचा इतिहास देखील तुम्ही लोक बदलणार आहात का? असा प्रश्न केला. सबंध महाराष्ट्रात गद्दार कोण? हे सगळ्यांना माहित आहे. तरीही मुख्यमंत्री त्यांची बाजू का घेतात, या शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांना सुनावले.

खासदार राऊत म्हणाले, गद्दार यांना गद्दार नाही तर काय म्हणायचे. रिक्षावाल्याला रिक्षावाला नाही तर काय म्हणायचे. यानिमित्ताने काही लोकांनी तोडफोड करून टीका करणाऱ्यांची तोंडे बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र महाराष्ट्र सरकार राज्यात हे घडते आहे, याचीच खंत वाटते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या समजून घेतली पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीच त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आणिबाणी काळात आंदोलन केले होते. आंदोलन करून त्यांचे नेते जेलमध्ये गेले होते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्याकाळी आंदोलन केले होते. याचा फडणवीस यांना विसर पडला आहे की काय? असा प्रश्न त्यांनी केला.

कुणाल कामरा याने केलेल्या कवितेनंतर शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या स्टुडिओची मोडतोड केली आहे. कुणाल कामरा यास धमक्या दिल्या आहेत. या संदर्भात पोलिसात गुन्हा देखील दाखल झाला आहे.

या सर्व वातावरणात मुख्यमंत्री फडणवीस दंगलखोरांची बाजू घेत आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आपल्या पक्षाचा आदर्श आणि यापूर्वी त्यांनी घेतलेली भूमिका विसरले की काय अशी स्थिती आहे. त्यामुळेच त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय आहे, हे समजून घेतल्यास बरे होईल. असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT