Poptrao Pawar
Poptrao Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar News : जुन्या पेन्शनसाठी शिक्षक संपावर; पोपटराव पवारांसह गावकरी झाले 'गुरुजी'

सरकारनामा ब्यूरो

Hiware Bazar : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामध्ये आरोग्य कार्मचाऱ्यांसह प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांचाही सहभाग आहे.

शिक्षकांनी संप पुकारल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यातच काही दिवसांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरे बाजार येथील सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यच 'गुरुजी' बनले आहेत.

याआधी कोरोना काळात देखील देशातील सर्व शाळा बंद असताना हिवरे बाजारमध्ये मात्र, कोविडच्या नियमांचे पालन करून शाळा सुरू ठेवण्यात आली होती. आता जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील शिक्षकांचा देखील सहभाग आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आदर्श गाव हिवरे बाजार येथील सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य व सुशिक्षित पालक हे विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

दरम्यान, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जे शासकीय कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. त्यांनी हा संप मागे घ्यावा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मात्र, अद्यापही कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला नाही. त्यामुळे हा संप कधी मिटणार? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT