Satyajeet Tambe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Satyajeet Tambe News : खासगी कंपन्यांना प्रवेश परीक्षांचे काम कशासाठी?

Sampat Devgire

B. Ed. Exams issue : बी. एड. परिक्षेतील गोंधळ अद्यापही संपलेला नाही. आज परिक्षेला गेलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची परिक्षा कालच झाली, असे सांगून त्यांना परत पाठवण्यात आले. या गोंधळाला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. (MLC Satyajeet Tambe angree on missmanagement of B.Ed. examination)

बी. एड. परिक्षेचा (Exams) गोंधळ संपता संपेना. त्यामुळे विद्यार्थ्यांना (Education) अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे राज्य शासनाने (Maharashtra Government) परिक्षांच्या गोंधळाला खाजगी संस्थांना सहभागी करून घेण्याची गरज काय? असा सवाल आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी केला आहे.

नाशिकमध्ये होणाऱ्या बी.एड. प्रवेश परीक्षेच्या वेळी गोंधळ उडाल्यानंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी हस्तक्षेप करत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. मात्र, स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षा यांच्या आयोजनात सातत्याने गोंधळ होत असून खासगी कंपन्यांना काम दिल्याने हे होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारने या गोंधळाची दखल घेत या पुढे असे होणार नाही, यासाठी निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी ट्वीट करत केली आहे.

बी.एड. साठीची प्रवेश परीक्षा बुधवारी नाशिक येथे होती. त्यानुसार धुळे, जळगाव, नंदुरबार येथील विद्यार्थ्यांना हॉल तिकीटही देण्यात आले होते. मात्र हे विद्यार्थी मंगळवारी परीक्षा केंद्रांवर पोहोचले, तेव्हा त्यांना परीक्षा मंगळवारीच झाल्याचे सांगण्यात आले. हॉल तिकिटावर २६ एप्रिल अशी तारीख असल्याने विद्यार्थ्यांनीही आपलीच बाजू योग्य असल्याचा दावा केला.

या परीक्षा आदल्या दिवशीच झाल्याचे आणि हॉल तिकिटावर चुकीची तारीख छापल्याचे निदर्शनास आल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर आमदार सत्यजीत तांबे यांनी तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करत विद्यार्थ्यांची बाजू उचलून धरली. घडल्या प्रकारात विद्यार्थ्यांची काहीच चूक नसताना त्यांनी त्याचे परिणाम का भोगावे, असा प्रश्न करत आमदार तांबे यांनी या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जावी, अशी आग्रही मागणी धरून लावली. त्यानुसार या विद्यार्थ्यांना दोन महाविद्यालयांमध्ये हलवून तेथे त्यांची परीक्षा घेण्यात आली.

सुदैवाने या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले नाही. मात्र स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षा यांच्या आयोजनात असे गोंधळ आजकाल नेहमीच होत चालले आहेत. या कंपन्यांचे नियोजन खासगी कंपन्यांच्या हाती दिल्यापासून हे गोंधळ वाढले असून सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT