Chhagan Bhujbal News : जिल्हा बँक कुणी बुडविली हे सर्वांना माहित आहे.

दराडेंनी स्वत:ला ओरिजनल शिवसैनिक म्हणून घेणे हा मोठा विनोद असल्याची प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोहन शेलार यांनी दिली.
Chhagan Bhujbal & Narendra Darade
Chhagan Bhujbal & Narendra DaradeSarkarnama

NCP on Narendra Darade : जिल्हा बँक आणि येवल्यातील सहकारी संस्था कुणी बुडविल्या हे येवल्यापासून ते नाशिकपर्यंत सर्वजण चांगलेच जाणून आहेl. दराडे बंधूनी विविध बँका आणि सहकारी संस्था मोडकळीस काढण्यात किती योगदान दिल हे सर्वश्रुत असून ‘जनता सब जाणती है’ अशी टीका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहन शेलार यांनी म्हटले आहे. (NCP leader Mohan Shelar replies on Darade`s alligation)

येवला (Yeola) बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC election) आरोप, प्रत्यारोप सुरु आहेत. याबाबत शिवसेनेचे (Shivsena) आमदार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर गंभीर टिका केली होती. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी उत्तर दिले आहे.

Chhagan Bhujbal & Narendra Darade
Chhagan Bhujbal On Darade : आमदार दराडे यांनी स्वतः उमेदवारी का नाही केली?

मोहन शेलार यांनी म्हटले आहे की, आमदार नरेंद्र दराडे यांनी भुजबळांविषयी केलेले वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. येवलेकर जनता ही अतिशय सुज्ञ असून त्यांना दराडे बंधूची ख्याती चांगलीच माहिती आहे असा उपरोधी टोला त्यांनी लगावला आहे.

दराडेंनी म्हटले आहे की, भुजबळांच्या आर्मस्ट्रॉग साखर कारखान्याने जिल्हा बँकेचे कर्ज थकविले. याबाबत दराडेंनी अभ्यास करून बोलण्याची गरज होती. कारण आर्मस्ट्रॉग साखर कारखान्यासाठी भुजबळांनी २० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी ८ कोटी रुपये नियमित भरले. दरम्यानच्या काळात ईडीची कारवाई झाली. आणि ईडी ने हा साखर कारखाना अॅटॅच केल्यामुळे व्याजाची रक्कम वाढत गेली.

Chhagan Bhujbal & Narendra Darade
Narendra Darade : भुजबळसाहेब, १५ कोटी घेतले, एक रुपया तरी परत केला का?

दुसरी गोष्ट म्हणजे सुमारे १०० कोटी रुपयांची किंमत असलेल्या या कारखान्याची मालमत्ता जिल्हा बँकेकडे गहाण आहे, त्यामुळे जिल्हा बँक आणि इतर बँका कुणी कशा बुडविल्या हे सर्व जनतेला माहित आहे. योग्य वेळ आल्यानंतर ते सर्व आम्ही जनतेसमोर मांडू अशी टीका त्यांनी केली.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, आमदार नरेंद्र दराडे यांनी भुजबळांना उद्देशून म्हटले की, मी ओरिजनल शिवसैनिक आहे, या वक्तव्याने हसू आवरेनासे झाले आहे. कारण ते भुजबळ साहेबांना सांगता आहे की, मी ओरिजनल शिवसैनिक आहे. हा तर मोठा विनोदच आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे येवलेकरांची चांगलीच करमणूक झाली.

Chhagan Bhujbal & Narendra Darade
Shivsena News: ठाकरेंच्या सभेत गुलाबरावांचे हात दाखवून अवलक्षण?

ते पुढे म्हणाले, भुजबळांनी शेपटीवर पाय देऊ नये असे दराडे सांगतात मात्र याच दराडेंनी परवाच्या प्रचार सभेत भुजबळांना येवल्याच्या बाहेर काढू अशी शेखी मिरविली. मग आता कोण कोणाच्या शेपटीवर पाय देतय हे त्यांनी अगोदर समजून घ्यावे. त्यानंतर विनोदी भाष्य माध्यमांमध्ये करावे अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com