Satyajeet Tambe News: विधिमंडळाच्या अधिवेशन कालावधीत कोणते प्रश्न मांडले. काय कामकाज केले. यांसह मतदारांनी सुचविलेल्या प्रश्नांबाबतचा लेखाजोखा मतदारांकडे मांडण्याचा प्रयोग आमदार सत्यजित तांबे यांनी सुरू केला आहे. त्यासाठी प्रत्येक अधिवेशनाच्या महिनाभर आधी संवाद साधतात.
संपर्काची साधने मर्यादित असताना अनेक लोकप्रतिनिधी विधिमंडळ अधिवेशन आटोपल्यावर आपल्या कामकाजाचा आढावा मतदारसंघात मांडत असत. काही लोकप्रतिनिधी वार्षिक अहवाल काढून ही माहिती मतदारांना देत असत. माहिती तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे आमदार सत्यजित तांबे यांनी हाच प्रयोग थेट मतदारांशी डिजिटल संवादाने सुरू ठेवला आहे.
आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील आणि मतदारांची कोणते प्रश्न आणि अडचणी आहेत. हे कळविण्यासाठी त्यांनी आवाहन केले आहे. या संदर्भात त्यांनी मतदारांची समाज माध्यमांवरून संवाद साधला. मतदारांकडून देखील त्यांना तेवढाच उत्साही प्रतिसाद मिळत आला आहे.
याबाबत आमदार तांबे म्हणाले, गेल्या अधिवेशनात स्पर्धा परीक्षा, शिक्षकांचे वेतन विषयक प्रश्न, नियुक्त्या, रखडलेल्या मान्यता आणि विविध प्रश्नांवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले. अधिवेशन संपल्यानंतर या प्रश्नांचे पुढे काय झाले, याचा पाठपुरावा करण्याचा माझा प्रयत्न असतो. केवळ विधिमंडळात प्रश्न मांडून ते सुटतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे अधिवेशन संपल्यावर प्रशासकीय स्तरावर आपण पाठपुरावा करतो.
मतदार मतदान करून लोकप्रतिनिधींना सभागृहात पाठवतात. त्यानंतर बऱ्याचदा मतदार आणि लोकप्रतिनिधी यांच्यात संपर्कच होत नाही, अशा तक्रारी असतात. मतदारांनी पाच वर्षातून एकदाच आपल्या आमदाराशी संपर्क येणे योग्य नाही. मतदारांनी आपले आमदार काय करतात, मंडळात त्यांचे वर्तन आणि कामकाज कसे असते, यावर देखील लक्ष ठेवले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विधीमंडळाच्या कामकाजात अनेकदा सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर गंभीर टीका करतात. विधिमंडळात गोंधळ होतो. अनेक प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होतो. त्यातून कामकाज बाधित होईल असे प्रयत्न काही सदस्य करतात.
मतदारांनी देखील आपले लोकप्रतिनिधी काय करतात, कसे वागतात हे पाहिले पाहिजे. मी स्वतः मात्र या गदारोळात शक्यतो पडत नाही. वाद आणि राजकारण या सगळ्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत असतो. आपले प्रश्न कसे मांडावे, शासनाचे लक्ष कसे वेधावे आणि ते सोडवावेत यावर माझे लक्ष केंद्रित असते, असे आमदार तांबे म्हणाले.
मतदारांशी संवाद कायम राहावा म्हणून समाज माध्यमांद्वारे आमदार तांबे संपर्कात राहतात. त्यातून मतदारांशी कनेक्ट राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आगामी पावसाळी अधिवेशनासाठी मतदारांनी आपले प्रश्न पाठवावेत असे आवाहन त्यांनी केले.
-------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.