Nashik Illegal money lending: अवैध सावकारांवर शहरात धाडी, रोकडच नव्हे डॉलरही सापडले, सर्वच राजकीय पक्षांशी लागेबांधे!

Police action; BJP and former ministers have direct links to moneylenders-शहरातील १३ सावकारांच्या घरी पोलिसांनी आणि सहकार विभागाने केलेल्या तपासणीत अनेक संशयास्पद कागदपत्रे
Rohit Kundalwal
Rohit KundalwalSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime: शहरातील अवैध सावकारीचा विळखा अनेकांना बसला आहे. यातून खंडणी आणि अपहरण यासारखे गंभीर गुन्हेही होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या अवैध सावकारी विरोधात शहरात मोहीम उघडली आहे.

भाजप नेता रोहित कुंडलवाल आणि वैभव देवरे या सावकारांचे प्रताप पोलिसांनाही अचंबित करणारे आहे. यामध्ये अनेक नागरिकांना त्याचा त्रास सोसावा लागला आहे. बेसुमार वसुली आणि अपहरण, खंडणी असे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे नाशिक शहरात ही सावकारी चर्चेचा विषय आहे.

Rohit Kundalwal
Sanjay Raut on MNS : ''...त्यासाठी निर्णय घेणाऱ्यांच्या अन् धोरणकर्त्यांच्या कानाखाली आवाज काढावा लागतो'' ; संजय राऊतांचा 'मनसे'ला टोला!

पार्श्वभूमीवर शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष मोहीम राबवली. पोलीस आणि सहकार विभागाने तेरा सावकारांच्या घरी धाडी घालून तपासणी करण्यात आली. त्यात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अनेक सावकारांकडे नोंदणी केलेले दस्त, धनादेश, लाखोंची रोकड अन् डॉलरही आढळले.

Rohit Kundalwal
MNS on Godavari Pollution : नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा 'तो' संदेश मनसैनिकांनी घेतला मनावर!

विशेष म्हणजे यातील बहुतांशी सावकार हे सत्ताधारी राजकीय पक्षांचे नेते आहेत. एका माजी माजी मंत्र्यांचा निकटवर्तीय तर अन्य एक विद्यमान आमदाराचा भाऊ देखील आहे. शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक आणि अन्य सत्ताधारी पक्षाशी या सावकारांचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. बहुतांशी सावकार राजकीय नेते म्हणून देखील वावरत आहेत. त्यामुळे अवैध सावकारीचा फटका राजकीय पक्षांनाही बसला आहे.

पोलिसांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे माजी नगरसेवक नय्या खैरे, संजय शिंदे, आकाश अहिरे, सुनील पिंपळे, गोकुळ धाडा, धनु लोखंडे, राजेंद्र जाधव आणि कैलास मैंद या सावकारांकडे विविध करारनामे तसेच नोंदणी केलेले दस्त, डायऱ्या, धनादेश, रोख रक्कम एवढेच नव्हे तर अमेरिकन डॉलर देखील सापडले आहेत. अन्य सावकारांकडे फारसे काही मिळाले नाही.

अवैध सावकारीमध्ये गेल्या महिन्यात पंचवटीतील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी मागण्यात आली होती. याच व्यापाऱ्याच्या पत्नी आणि मुलीचा विनयभंग देखील करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस अलर्ट झाले. सध्या पोलीस आणि सहकार विभागाने राबविलेल्या मोहिमेमुळे अवैध सावकारांची झोप उडाली आहे. या सावकारांचा माजी मंत्री, आमदारांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी थेट संबंध असल्याने राजकीय नेतेही धास्तावले आहेत.

-------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com