Satyajeet Tambe  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Satyajeet Tambe News : सत्यजीत तांबेंनी भाजपात यावं; भाजपच्या मोठ्या नेत्याने दिली पक्षप्रवेशाची ऑफर

Radhakrishna Vikhe Patil : ''मामाने (बाळासाहेब थोरात) पक्षाला मामा बनवले...''

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या(Nashik Graduate Constituency) निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. खरं तर नाशिक पदवीधरची ही निवडणूक सुरुवातीपासून चर्चेची ठरली. असे असतानाच आता अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांच्या समर्थनार्थ भाजपचे काही नेते आणि स्थानिक कार्यकर्त्ये मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सत्यजीत तांबेंना भाजपमध्ये येण्याची ऑफरच दिली.

विखे पाटील म्हणाले, ''नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजीत तांबे यांचा विजय निश्चित आहे. अन्य उमेदवारांची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबेंसाठी मोठे काम केले आहे. त्यामुळे सत्यजीत तांबेंनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी आमचा आग्रह कायम राहणार आहे'', असं विखे पाटील म्हणाले.

''सुधीर तांबे यांच्यामध्ये काँग्रेसचे रक्त आहे. ते कमी व्हायला अजून थोडा वेळ लागेल'', असा मिश्कील टोमणा लगावत ''सत्यजीत तांबे हे भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या सहकार्याचा आदर, सन्मान नक्कीच ठेवतील'', असं राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले.

तसेच यावेळी विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांनाही टोला लगावला. ''मामाने आता काय करावे हे मामाने ठरवावे. मात्र, मामाने (बाळासाहेब थोरात) पक्षाला मामा बनवले आहे'', असं म्हणत विखे पाटलांनी थोरातांना टोला लगावला.

दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये अर्ज भरण्यापासून आजपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे या नाशिक पदवीधर मतदारसंघाची राज्यभर चर्चा होत आहे. त्यातच आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्यजीत तांबेंना पक्षात येण्याची ऑफर दिल्यामुळे पुन्हा एकदा चर्चाला उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT