Ambadas Khaire
Ambadas Khaire Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP: नाशिककरांना अवजड वाहनांपासून वाचवा!

Sampat Devgire

नाशिक : शहरात (Nashik) गेले काही दिवस सातत्याने गंभीर स्वरूपाचे अपघात (Accidents) होत आहेत. वाहतूक कोंडीचे (Traffic jamm) प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नाशिककरांना वाहन चालविणे आणि रस्त्यांवर पायी चालणे देखील अडचणीचे झाले आहे. शहरवासीयांना त्यातून दिलासा देण्यासाठी अवजड वाहनांना (Heavy vehicles) दिवसा बंदी घालावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष अंबादास खैरे (Ambadas Khaire) यांनी केली आहे. (NCP deemands prohibition of day time heavy Vehicles In City)

यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने यापूर्वी आंदोलन केले होते. आज त्यांनी वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.

शहरातील वाहतूक कोंडी व अपघातांची मालिका बघता नाशिक शहरात अवजड वाहनांना दिवसा बंदी घालावी असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निवेदन दिले.

गेल्या आठवड्यात फेम सिग्नल येथून औरंगाबाद महामार्गावर वळविण्यात आलेल्या अवजड वाहनाच्या अपघातामुळे आई व मुलगा यांचे दुखद निधन झाले होते. या मार्गावरील अवजड वाहनांच्या विरोधात स्थानिकांनी अनेकदा निवेदने देऊन या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी करून आंदोलने केले आहे.

शहराचा विस्तार झपाट्याने होत असून वाहनधारकांची संख्या वाढल्याने रहदारीमध्ये वाढ झाली आहे. त्याकारणाने रस्त्यांची संख्या व रुंदी कमी पडू लागली आहे. मुंबई, पुणे या शहरानंतर नाशिकचा क्रमांक येत असल्याने मुंबई-पुणे शहरातील वाहतूक कोंडी व अपघातांची मालिका होऊ नये याकरिता मेट्रो सिटीप्रमाणे अवजड वाहनांना वेळ ठरवून देणे आवश्यक आहे. अवजड वाहने नाशिक शहरातील रिंग रोड वरून वळविण्यात आल्याने लहान वाहने पर्यायी मुख्य मार्गाचा वापर करतात. परंतु या मुख्य मार्गावर सिटी बस, खाजगी बस व बांधकाम मालवाहतूक अवजड वाहने असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते.

वाहनांची संख्या व वाहतूक कोंडीच्या प्रश्नांचा विचार दिवसा अवजड वाहनांना नाशिक शहरात प्रवेश बंदी करण्यात यावी. त्यामुळे या समस्येतून शहरवासीयांची सुटका होईल.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT