उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का; यशवर्धन कदमबांडे शिवसेनेत!

आदित्य ठाकरे देणार युवा सेनेची नवी जबाबदारी
Yashwardhan Kadambande with Aditya Thackeray
Yashwardhan Kadambande with Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

धुळे : भाजप (BJP) युवा मोर्चाचे पदाधिकारी यशवर्धन कदमबांडे (Yashovardhan Kadambande) यांनी मुंबईत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. त्यांचे माजी पर्यावरण मंत्री व युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी स्वागत केले. (Shivsena gives big shock to BJP by Kadambande`s entry)

Yashwardhan Kadambande with Aditya Thackeray
`ओडिशा`च्या प्रमाणे राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्या!

शिवसेनेत प्रवेशाचा माझा व्यक्तीगत निर्णय असून, पक्ष संघटनांसह ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या शिवसेनेच्या ध्येयाप्रमाणे कार्यरत राहणार असल्याची भूमिका श्री. कदमबांडे यांनी मांडली. ‘मातोश्री’वर बुधवारी दुपारी झालेल्या शिवसेनेच्या प्रवेश सोहळ्यावेळी श्री. कदमबांडे यांच्यासह ललित माळी व सहकारी उपस्थित होते. त्यांच्या प्रवेशामुळे युवा चेहरा मिळाला आहे.

Yashwardhan Kadambande with Aditya Thackeray
नाशिकच्या ‘स्मार्टसिटी’च्या कामाची चौकशी करा

श्री. कदमबांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. ते छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याशी संबंधीत आहेत. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतला. शिवसेनेत प्रवेशाचा माझा वैयक्तीक निर्णय असल्याने त्याचा वेगळा अर्थ काढू नये. दोन ते तीन वर्षांपासून व्यवसायामुळे राजकारणापासून अलिप्त होतो. आता ॲक्टिव्ह होण्याचे ठरविले आहे.

ते म्हणाले, कोरोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रभावी कामकाज केले. सक्षमपणे राज्याचा गाडा हाकला. त्यामुळे त्यांच्यासह शिवसेनेकडे आकर्षित झालो, असे श्री. कदमबांडे यांनी सांगितले. ते भाजपचे नेते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे पुत्र आहेत.

श्री. यश यांचा शिवसेनेत प्रवेशाचा स्वतंत्र निर्णय आहे. मी भाजपशी एकनिष्ठ असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार अमरिशभाई पटेल माझे नेते असल्याने मी भाजपमध्येच राहील. आमदार पटेल यांची साथ सोडणार नाही, असे राजवर्धन कदमबांडे म्हणाले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com