Nashik News, 29 Mar : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक (Nashik) उपकेंद्राच्या नामकरणावरून वाद सुरू आहे. विविध राजकीय पक्षांनी त्यात उडी घेतली आहे. त्यामुळे नाशिकमधील राजकारण या विषयावरून तापलं आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिकच्या उपकेंद्राला वेगळे नाव देण्याची गरजच काय? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उपस्थित केला आहे. अशा प्रकारचे वाद निर्माण करणे चुकीचे आहे. हे प्रकार तातडीने थांबवले पाहिजेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आहे. अन्य विद्यापीठांना देखील उपकेंद्र आहेत. कोणत्याही उपकेंद्रांना नावे दिलेली नाहीत. अशा परिस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रालाच नाव देण्याचा खटाटोप कशासाठी सुरू आहे.
सावित्रीबाई फुले हे नाव घेतल्याने कोणाचे काही बिघडणार आहे का? असा प्रश्न त्यांनी केला. विद्यापीठाच्या उपकेंद्राला नाव देणे योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावरून नाशिक शहरातील राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटना यांच्यात आधीच वाद सुरू आहे.
या केंद्राला कर्मवीर भाऊसाहेब हिरे असे नाव देण्याचा ठराव सिनेट मंडळांनी घेतला आहे. तर एका गटाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचा आग्रह धरला जात आहे. या विषयावरून एक वेगळेच राजकारण पेटले आहे. त्यावर भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले जी नावे घेतली जात आहेत, ती नावे सावित्रीबाई फुले यांच्यापेक्षा मोठी तर निश्चितच नाहीत. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रालाच वेगळी नावे देण्याचा प्रकार सुरू झाला आहे. उपकेंद्राच्या निर्मितीसाठी आणि उभारणीसाठी आम्ही देखील प्रयत्न केले आहेत. मात्र अशा प्रकारे वेगळे नाव देऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने चुकीचे पांडे पाडणे योग्य नाही, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.