Santosh Deshmukh : पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच देशमुखांची हत्या? प्रत्यक्षदर्शीचा जबाबात मोठा खुलासा, "अपहरण होताच पोलिस स्टेशनमध्ये गेलो पण..."

Beed Police Controversy : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड पोलिस वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पहिल्यापासूनच या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं आरोप विरोधकांसह देशमुख कुटुंबियांकडून केला जात आहे.
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder CaseSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 29 Mar : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड पोलिस वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पहिल्यापासूनच या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं आरोप विरोधकांसह देशमुख कुटुंबियांकडून केला जात आहे.

त्यामुळे या हत्येनंतर अनेक पोलिसांचं निलंबन देखील करण्यात आलं होतं. अशातच आता पोलिसांनी हलगर्जीपणा केला नसता तर कदाचित संतोष देशमुख यांच्या हत्येचा मोठा अनर्थ टळला असता, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे, ज्यावेळी संतोष देशमुख केजवरून मस्साजोगला जात होते.

त्यावेळी त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने आपल्या जबाबात धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, संतोष देशमुखांचं ज्या केज-बीड रस्त्यावरील टोल नाक्यावरून अपहरण करण्यात आलं. त्यावेळी देशमुख यांची गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला कोयत्याचा धाक दाखवून त्यांचं अपहरण करण्यात आलं.

Santosh Deshmukh Murder Case
Satara Murder Case : भाजप नेत्याच्या भावाने रत्नशिवला गाडीने उडवलं, कोयत्याने वार करून संपवलं, साताऱ्यातील 'त्या' हत्येप्रकरणी दमानियांचा खळबळजन खुलासा

संतापजनक बाब म्हणजे या घटनेनंतर सदर व्यक्तीने सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर धनंजय यांनी त्यांना लगेच पोलिस स्टेशनमध्ये जायला सांगितलं. यावेळी सदरील प्रत्यक्षदर्शी पोलिस स्टेशनला गेला. मात्र, या व्यक्तीला पोलिसांनी जपळपास तीन ते साडेतीन तास त्याला पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं.

काहीच कारवाई न करता आणि तत्परता देखील दाखवली नसल्याचं या प्रत्यक्षदर्शीने आपल्या जबाबत सांगितलं. शिवाय नवीन कायदा आहे, पुस्तक बघून जबाब लिहावा लागतो, असं कारण दिल्याचंही त्याने सांगितलं. त्यामुळे आता पोलिसांनी या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेऊन तात्काळ कारवाई केली असती गाडीचा पाठलाग केला असता तर कदाचित सरपंचांची हत्या टाळता आली असती असं बोललं जात आहे.

Santosh Deshmukh Murder Case
Girish Mahajan : अंदर की बात; साधूंच्या अव्वाच्या सव्वा मागण्यांनी मंत्री महाजन सावध!

मात्र, पोलिसांनी विलंब केल्यामुळे ही घटना घडली. महत्वाचं म्हणजे त्यावेळी पोलिस स्टेशनमध्ये पीआय महाजन आणि बनसोडे नावाचे अधिकारी उपस्थित होते. हत्येच्या काही दिवसांपूर्वीच आवादा कंपनीने या आरोपीच्या विरोधात कंपनीत येऊन धमकावल्याची तक्रार दिली होती.

त्यामुळे या घटनेचं गांभीर्य पीआय महाजन यांना माहिती होतं तरीही त्यांनी कार्य तत्परता दाखवली नाही. शिवाय महाजन यांनी मनात आणलं असंत तर आरोपींचं मोबाईल लोकेशन शोधून त्यांनी देशमुखांचं अपहरण करणाऱ्या स्कार्पिओचा शोध घेतला असता.

मात्र पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे अखेर सरपंच देशमुख यांना जीव गमवावा लागल्याचा संताप आता व्यक्त केला जात आहे. दरम्यान, देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पोलिस स्टेशनला फोन येताच पोलिसांनी आपली तात्काळ सही घेतल्याचा दावाही सदरील प्रत्यक्षदर्शीने केला आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com