Jayant Patil News, Shivsena News, Uddhav Thackeray News
Jayant Patil News, Shivsena News, Uddhav Thackeray News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

थोडं थांबा, उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होतील!

Sampat Devgire

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) आमदारांच्या निलंबनाबाबत पाच सदस्यांचे खंडपीठ नियुक्त करण्याचे आदेश दिले आहे. त्यात व्हीप झुगारणारे आमदार अपात्र ठरतील. त्यामुळे राज्यपालांना (Governer) पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांनाच मुख्यमंत्री करावे लागेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केले. (Governer will have to give oath Uddhav Thakrey as CM)

ते एका वाहिनीच्या पत्रकाराशी बोलत होते. ते म्हणाले, शिवसेनेच्या आमदारांनी पक्षाचा व्हीप झुगारून मतदान केलेले आहे. त्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये होईल. त्यासाठी खंडपीठाची नेमणूक हीच सर्वोच्च न्यायालयाची कृती अतिशय गंभीर आहे. विधीमंडळात जे काम झाले आहे. ते सर्वोच्च न्यायालयाने अतिशय गांभिर्याने घेतले आहे, हा त्याचा संदेश आहे.(Uddhav Thackeray latest Marathi news)

ते म्हणाले, याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींची नियुक्ती झाल्यावर या खंडपीठाचे कामकाज सुरु होईल. त्यातून या सगळ्याचा उलगडा होईल. त्याला काही काळ लागेल, मात्र देर है अंधेर नही है. असे जे म्हणतात ते सर्व यामध्ये घडेल. हा निकाल लागल्यावर पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येईल, अशी आम्हाला खात्री आहे.

जयंत पाटील यांनी राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रपती निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या भूमिकेचे समर्थन केले. ते म्हणाले, नेहेमीच त्यांना जो उमेदवार योग्य वाटतो, त्यांना त्यांनी पाठींबा दिलेला आहे. यापुर्वी प्रणव मुखर्जी यांना शिवसेनेने पाठींबा दिला होता. महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील काँग्रेसच्या उमेदवार होत्या, त्यांनाही त्यांनी पाठींबा दिला होता. यंदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला आहेत. त्यामुळे हा पाठींबा दिलेला आहे. हा पाठींबा `एनडीए` सरकारला नव्हे तर मुर्मू यांना आहे, असे आम्ही समजतो.

ओबीसी आरक्षणाबाबत श्री. पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकावे यासाठी आम्ही रात्रंदिवस काम केले. बांठीया समिती नियुक्त केली. या समितीमार्फत इंम्पीरीकल डेटा तयार करण्याबाबत महत्त्वाचे काम झाले. या आयोगाने जे सर्व माहितीचे एकत्रीकरण करून हे काम कोणत्या सरकारचे आहे. ते आमच्याच सरकारचे काम आहे. हाच डेटा पुढे प्रोसेस करण्याचे काम आम्ही केले होते. तोच डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील हेच सांगितलेले आहे. सात दिवस थांबा, त्यानंतर पुढील काम होईल.

महाराष्ट्रात भविष्यात आम्ही महाविकास आघाडीचे घटक म्हणून आम्ही दोन्ही काँग्रेस व शिवसेना सर्व पक्षांना बरोबर घेऊन राज्याच्या हितासाठी अधकि चांगले काम करू, असे श्री. पाटील म्हणाले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT