Sangita Gaikwad
Sangita Gaikwad Shivsena
उत्तर महाराष्ट्र

राज्यात उद्या शाळा उघडणार...नाशिक शहरात शाळा उघडण्याचा निर्णय लांबणीवर

Sampat Devgire

नाशिक : गेल्या दीड ते पावणेदोन वर्षांपासून ऑनलाइन अभ्यासाचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांना एक डिसेंबरपासून शाळेत जाण्याचा मार्ग शासनाने मोकळा केला असला तरी ‘ओमिक्रॉन’ या नव्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे महापालिका प्रशासनाने पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय दहा डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकला आहे.

दरम्यान याबाबत महापालिका शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा संगिता गायकवाड यांनी कोरोनाच्या तिसऱ्या व्हेरिएंटबाबत प्रशासनाने शाळा उघडण्याचा निर्णय घ्यायचा आहे. याबाबत कोणत्याही परिस्थितीत पालक. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी अडचणी येऊ नयेत. त्याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर केंद्र सरकारने देशभरात लॉकडाउन जाहीर केला. पहिल्या लाटेने हाहाकार उडविल्यानंतर या वर्षाच्या जानेवारी महिन्यात पुन्हा दुसरी लाट सुरू झाली. मे महिन्यापर्यंत दुसरी लाटदेखील ओसरली. आता तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दरम्यान २६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. लसीकरणाचे उद्दिष्ट अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही. या दरम्यान शाळा बंद करण्यात आल्या होत्या. चार ऑक्टोबरपासून शहरी भागातील आठवी ते बारावी, तसेच ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर एक डिसेंबरपासून पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी जाहीर केला.

एक डिसेंबरला शाळा सुरू होणार असल्याने शाळा व्यवस्थापनांसह पालकांची तयारी झाली असतानाच ‘ओमिक्रॉन’ या नव्या व्हेरियंटमुळे केंद्र व राज्य शासनाने कोरोनाविषयक नियम अधिक कठोर केले आहे. त्यामुळे सावधगिरीचा भाग म्हणून महापालिका हद्दीतील खासगी व शासकीय शाळा एक डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. दहा डिसेंबरनंतर शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय बैठकीनंतर घेतला जाणार आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी खाते प्रमुखांच्या बैठकीत निर्देश दिले आहे.

मंगल कार्यालये, लॉन्सची तपासणी

मंगल कार्यालये व लॉन्स, तसेच लग्नकार्य होणाऱ्या भागात अचानक तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी अठरा पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, दोन डोस घेतलेले नसल्यास अशांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्याचबरोबर परदेशातून आलेल्या नागरिकांचा अहवाल राज्य शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर तपासणी करून संस्थात्मक विलगीकरण केले जाणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

...

ओमिक्रॉनमुळे सावधगिरीचा भाग म्हणून पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहा दिवसांची परिस्थिती बघून निर्णय घेवू.

- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT