Anna Hazare On Narendra Modi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anna Hazare On Manipur: काय होणार या देशाचे? अण्णा हजारे मोदींवर भडकले

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News: मणिपूरमधील हिंसाचारावरून विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बोट दाखवत असतानाच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचीही या घटनेच्या आरोप-प्रत्यारोपात 'एन्ट्री' झाली आहे. या घटनेवरून मोदींना पत्र पाठविण्याआधीच अण्णांनी केंद्र सरकारला बोचऱ्या शब्दांत सवाल-जबाब केले आहेत.

अशा घटनांवर भारत सरकार आणि इतर कोणीही काहीच बोलत नाही. मग काय होणार या देशाचे, असा विचार करायला भाग पाडणारा प्रश्नच अण्णांनी मोदींना उद्धेशूनच विचारला. महिलांवरील अत्याचारातील नराधमांना फाशीवर लटकवले पाहिजे, याकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. अण्णांच्या या भूमिकेवर केंद्र सरकार विशेषत:मोदींची काय 'रिअ‍ॅक्शन' असेल, याकडे लक्ष राहणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधक रोज भिडत आहेत. मणिपूरातल्या भाजप आमदारांनीही थेट मोदींवर हल्ला चढून या घटनेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. हिंसाचाराच्या घटनांचे गांभीर्य ओळखून अण्णा हजारे मोदींना पत्र धाडणार आहेत. त्याआधीच अण्णांनी माध्यमांपुढे आपली भावनाही मांडली.

यासंदर्भात बोलताना अण्णा म्हणाले, स्त्री ही माता-भगिनी असते, तिला विवस्त्र करून तिच्यावर अत्याचार करणे मनाला वेदना देणारे आहे. स्त्री ही माता-भगिनी आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे. विशेष करून सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या पत्नीवर याप्रकारे अन्याय-अत्याचार व्हावेत, हे अत्यंत गंभीर असल्याचे अण्णांनी नमूद केले.

मणिपूर घटनेवर अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमातून दिली. यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रश्न करत अण्णांनी बऱ्याच कालावधीनंतर मणिपूर घटनेवर प्रतिक्रिया दिली. मात्र, महिला कुस्तीपटूंवर झालेल्या अन्याय-अत्याचाराबाबत तसेच लोकप्रतिनिधींच्या आर्थिक भष्ट्राचारावर अण्णांनी आता बोलले पाहिजे, आंदोलन केले पाहिजे, त्याला आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ, असे मत राऊतांनी व्यक्त केले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT