Anna Hazare News: शिंदे-फडणवीसांविरोधातील लढ्यासाठी राऊतांची अण्णा हजारेंना हाक

Anna Hazare : अण्णा हजारे यांनी नुकतीच मणिपूरचा हिंसाचार हा मानवतेला कलंक असल्याची टीका केली.
Anna Hajare
Anna Hajare Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना राज्यातील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी साद घातली आहे. महाराष्ट्रातील भ्रष्ट्राचारी सरकारविरोधात अण्णा कधी बोलणार, याची आम्ही वाट पाहत आहोत, असा सवाल विचारत या देशाला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा अण्णांच्या आंदोलनाची गरज आहे, आम्हीही त्यांच्यासोबत आहोत, असं राऊत यांनी म्हटलं आहे. राऊतांच्या या हाकेला आता अण्णा हजारे काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अण्णा हजारे यांनी नुकतीच मणिपूरचा हिंसाचार हा मानवतेला कलंक असल्याची टीका केली. या टीकेनंतर संजय राऊत यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची पुन्हा एकदा राज्याला गरज असल्याचं म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर सांगत राज्यातील भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी आवाज उठवावा, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. असंही राऊतांनी म्हटलं आहे.

संजय राऊत म्हणाले,अण्णांनी थेट मणिपूरच्या हिंसाचाराच्या विषयालाच हात घातला.पण देशात अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. भ्रष्टाचार विरोधी म्हणून अण्णांची ओळख आहे. भाजपाने महाराष्ट्रात पुराव्यांसह ज्या-ज्या लोकांवर आरोप केले ते सगळे नंतर भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाले. यावरही अण्णा हजारेंनी आवाज उठवला पाहिजे.

शिवसेनेशी बेईमानी करून भाजपसोबत गेलेले बंडखोर नेते, अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यावर हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. याविषयावर अण्णा हजारेंनी मोठ्या आंदोलन केलं पाहिजे.आम्हीही त्यांच्याबरोबर आहोत.असंही राऊतांनी म्हटलं आहे. दादा भुसे यांचा 178 कोटी घोटाळा, राहुल कुल, अब्दुल सत्तार, राधाकृष्ण विखे पाटील यांचे घोटाळे अण्णांच्या समोर घडले.

रामलीला मैदानावर अण्णांनी केलेल्या आंदोलनाने देशाला जाग केलं होतं.आज अण्णांच्या आंदोलनाची खरी गरज आहे.अण्णांच्या आंदोलनामुळे भाजप सत्तेत आला, काँग्रेस पायउतार झाली. अण्णांना विनंती आहे हा देश वाचवायचा आहे, पण आज पुन्हा भाजपाच्या भ्रष्टाचाराविरोधात अण्णांनी रणशिंग फुंकण्याची गरज असल्याची मागणी राऊतांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com