Welcoming Nivruttinath Dindi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Trimbakeshwar Dindi: निवृत्तीनाथ दिंडीच्या सेवेच्या परंपरेतून "एक है तो, सेफ है" ला कडक उत्तर!

Sent Nivrittinath Dindi; Message from Muslim activists from the welcome and service of Nivruttinath Dindi-वडांगळी (सिन्नर) येथील डॉ झाकीर शेख यांनी जपली दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत, आदरातीथ्य करण्याची परंपरा

Sampat Devgire

Nashik Politics: महाकुंभमेळ्यापासून तर विविध धार्मिक स्थळे सध्या राजकीय हस्तक्षेप आणि ध्रुवीकरणाचे राजकारण शिरले आहे. त्याला वडांगळी (सिन्नर) येथील ग्रामस्थांनी छेद देण्याचे मोठे काम केले आहे. त्यामुळे वडांगळीतील हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.

त्र्यंबकेश्वर येथे येत्या शनिवारी संत निवृत्तीनाथ समाधी स्थळी यात्रा होणार आहे. त्यासाठी सध्या राज्याच्या विविध भागातून दिंड्या त्र्यंबकला दाखल होत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर च्या मार्गावर सध्या टाळ मृदुंगाचा आणि भजनाचा गजर कानी पडतो.

या दिंड्यांचे ठिकठिकाणी आणि परंपरेने ठरलेल्या गावांमध्ये उत्साहाने स्वागत होते. दिंडीतील वारकऱ्यांची सेवा केली जाते. दिंडी प्रमुखांचा सत्कार होतो. या परंपरेत वडांगळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष डॉ झाकीर शेख हे गेली अनेक वर्ष या दिंडीचे उस्फुर्त आणि मोठ्या प्रमाणावर स्वागत करतात.

दिंडीतील वारकऱ्यांना भोजन दिले जाते. दिंडी प्रमुखाचा सत्कार केला जातो. गेली अनेक वर्ष सुरू असलेली ही परंपरा यंदा अधिक उत्साहाने पार पडली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून तर महा कुंभमेळ्यापर्यंत मुस्लिम समाजाला वेगळे करण्याचा प्रयत्न राजकीय हेतूने होतो.

ठराविक विचारसरणीच्या लोकांकडून ते प्रचारित केले जाते. सोशल मीडियावरही सध्या याच बातम्यांचा बोलबाला आहे. या सर्वांना छेद देण्याचे काम वडांगळी येथील ग्रामस्थ आणि डॉ. शेख यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ शेख आणि वडांगळी येथील कार्यकर्त्यांनी त्र्यंबक रोड येथे पिंपळगाव बहुला गावात खिचडी, केळी, खजूर, उपवासाचे पदार्थ आणि चहा पाण्याची सोय दिंडीसाठी केली होती. त्र्यंबक विद्यामंदिर येथे या दिंड्यांचे स्वागत केले जात होते. दिंडी प्रमुख ह. भ. प. केदारनाथ महाराज पवार, ह. भ. प. नामदेव महाराज खुळे आणि अन्य दिंडी प्रमुखांचे हार आणि महा वस्त्र देऊन स्वागत केले.

दिंडीतील सर्वच वारकऱ्यांची विचारपूस आणि अल्पपोहर देण्यात आला. या उपक्रमात उमेश खुळे, रमेश खुळे, गणेश खुळे, केशव भोकनळ, राजेंद्र सुके, किशोर खुळे, बबलू गायकवाड यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी आपला सहभाग दिला त्यात डॉ शेख हे अग्रस्थानी होते. डॉक्टर शेख गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत.

सध्या त्र्यंबकेश्वरला शेकडो दिंड्या दाखल होत आहेत. या दिंड्यांच्या मार्गावर विविध गावात सप्ताह सुरू आहेत. विविध धर्माचे नागरिक वारकऱ्यांच्या स्वागताला आवर्जून हजर असतात. त्यामुळे संत निवृत्तीनाथ दिंडीच्या माध्यमातून सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात ते यशस्वी झाल्याचे चित्र आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT