Eknath Khadase Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadase demands separate khandesh: महाराष्ट्रातून खान्देश वेगळा करा; खडसेंनी अशी मागणी का केली?

Jalgaon Politics| गेल्या दहा-बारा वर्षांत जळगाव जिल्ह्यासाठी अनेक मोठ्या प्रकल्पांना परवानगी मिळाली

सरकारनामा ब्यूरो

Eknath Khadase demands separate khandesh : ‘महाराष्ट्रातून खान्देश वेगळा करा’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली. शुक्रवारी जळगावातील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याचवेळी त्यांनी जळगाव जिल्हा आणि खान्देशासाठी मंजूर झालेले विकास प्रकल्प दुसरीकडे हलवण्यात आल्याने एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी संतापही व्यक्त केला. (Separate Khandesh from Maharashtra; Why did Khadse make such a demand)

“काही दिवसापुर्वी मंत्रिमंडळाने जळगावसाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं होतं. महाविद्यालयासाठी सालबर्डी गावात 60 एकर जागाही सरकारने अधिग्रहित केली. उर्वरित जागा नवीन वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाजूला घेण्याचं काम सुरु होतं. त्या जागेची पाहणी करुन त्या जागेसाठीही अंतिम निर्णय झाला. पण एवढं सगळं झालं असतानाही तो प्रकल्प अकोल्याला हलवणं म्हणजे खान्देशावर (Khandesh) अन्याय आहे. उत्तर महाराष्ट्रावर अन्याय आहे”, असा संतापही खडसेंनी व्यक्त केला.

वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रापाठोपाठ,आता पशुवैद्यकीय महाविद्यालयही दुसरीकडे हलवण्यात आलं, पण जिल्ह्यातील आणि पालकमंत्री निमूटपणे त्याकडे पाहत बसले, मी बोललो पण सरकारने कुठलीही कारवाई केली नाही. दावाही एकनाथ खडसे यांनी केला. कोणतेही प्रकल्प होत नसल्याने खान्देशचा विकास होत आहे. त्यामुळे इच्छा नसतानाही खान्देश महाराष्ट्रापासून वेगळा करा, अशी मागणी करावी लागत आहे. असा दावा खडसेंनी केला.

गेल्या दहा-बारा वर्षांत जळगाव जिल्ह्यासाठी अनेक मोठ्या प्रकल्पांना परवानगी मिळाली. अनेक प्रकल्प पाईपलाईनमध्ये आहेत. काही मंजुरीपर्यंत पोहोचले आहेत. पण गेल्या 10 वर्षात या प्रकल्पांना गती मिळाली नाही पण हेही प्रकल्प बाहेर जिल्ह्यामध्ये हलवण्याचा आता प्रयत्न सुरु आहे,'' असा आरोपही खडसेंनी केला. (Jalgaon Politics)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT