Uddhav Thackeray & Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Politics : शानेहिंद यांचा ठाकरे, शरद पवारांना टाटा, समाजवादीत प्रवेश करणार!

Shan-E-Hind Ahemad will joine Samajwadi Party Today : जनता दल धर्मनिरपेक्षला सोडचिठ्ठी दिलेल्या शानेहिंद अहमद यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे निमंत्रण धुडकावले.

Sampat Devgire

Melegeon Politics : धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सर्वेसर्वा, माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी भाजपशी युती केली. त्यामुळे पक्षाची शाखा बरखास्त केलेल्या मालेगावचे ज्येष्ठ समाजवादी नेते (कै) निहाल अहमद यांची कन्या शानेहिंद यांनी अखेर समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. (Malegaon leader Shan-E-Hind have got invitation to joine Shivsena)

शानेहिंद अहमद (Malegaon) यांनी शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून पक्षात प्रवेश करण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्यांनी अल्पसंख्याक समाजाच्या हिताच्या दृष्टीने समाजवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी कर्नाटकातील राजकारणाचा भाग म्हणून भारतीय जनता पक्षाशी युती केली. त्याच्या प्रतिक्रिया सर्वदूर उमटल्या. महाराष्ट्र शाखा बरखास्त करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला होता. मालेगाव येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत शाखा बरखास्त करून भाजपशी सख्य विचारधारेशी प्रतारणा असल्याने त्याचा विरोध केला होता.

या निर्णयाने मालेगावच्या राजकारणावर त्याचा परिणाम झाला. त्यावर शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून शानेहिंद यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी विनंती केली होती. त्यानंतर शानेहिंद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीदेखील भेट घेतली होती. काँग्रेसचा पर्यायदेखील त्यांच्यापुढे होता. मात्र, या सर्व पर्यायांना नाकारत त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जनता दलाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राज्यातील काही प्रमुख नेत्यांसह पक्षाच्या येथील मावळत्या अध्यक्षा शानेहिंद निहाल अहमद, सरचिटणीस मुश्‍तकिम डिग्निटी व सहकारी आज समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. देशात सध्या धर्मनिरपेक्ष व जातीयवादी असे दोन विचारप्रवाह आहेत. जनसंघ व भाजप संलग्न पक्षांमध्ये सहभागी होण्याचा विषयच नाही. यासंदर्भात अखिलेश यादव यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. कॉंग्रेसचे कल्चर वेगळेच असल्याने आम्ही आमच्या विचारधारा मानणाऱ्या पक्षात समाविष्ट होत असल्याचे मुश्‍तकिम डिग्निटी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT