Gram Panchayat Results : इगतपुरी तालुक्यात सोळा ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या अनुयायांनी अतिशय चुरशीने लढत दिली. त्यांनी मोठा विजय मिळाल्याने प्रस्थापितांना धक्का बसला आहे. (MNS followers given serious fight with eastablished Politicians)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी इगतपुरी (Nashik) तालुक्यात अतिशय जोमाने लढत देत चार सरपंच विजयी केले. काँग्रेसच्या (Congress) आमदाराचा हा मतदारसंघ असल्याने हा विजय अनपेक्षित ठरला.
इगतपुरी तालुक्यात सोळा ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचा मतदारसंघ आणि शिवसेनेचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात अतिशय चुरस होती. प्रत्येकाने पूर्ण ताकद लावली होती. त्यात राज ठाकरे यांच्या समर्थकांनी राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यात प्रस्थापित नेत्यांना हादरा बसल्याने त्याची चर्चा आहे.
थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी चार ग्रामपंचायतीत बाजी मारली. यामध्ये मोगरे ग्रामपंचायतीत प्रताप विठ्ठल जाखेरे, टाके घोटी येथे माधुरी अरुण आडोळे, नागोसली येथे काशिनाथ होले, ओंडली येथे प्रकाश खडके सरपंचपदी विजयी झाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे, तालुकाध्यक्ष रामदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका झाल्या. त्यात सदस्यपदी सीता जाखेरे, योगिता उघडे, सोनी गवारी, शिवाजी जाखेरे, एकनाथ नाडेकर, मच्छिंद्र दालभगत, धारगाव येथे रंजन गोवर्धने, तानाजी खातळे, लता मेंगाळ, सुनीता पारधी, राहुल कामडी, गोटीराम पादीर, भिमा पोकळे विजयी झाले. नागोसली येथे गणेश मुतर्डक, कनिता होले, सुरेश धापटे, आशा गिरे, ओंडली ग्रामपंचायतीत चंद्रकांत वाघ, बेबीताई शेंडे विजयी झाले. उभाडे येथे शांताराम पदमिरे बिनविरोध निवडून आले.
तालुक्यात १६ पैकी चार ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मनसेच्या सर्वांत जास्त जागा निवडून येतील, असा विश्वास जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.