The Shani Shingnapur Devasthan Trust announced the termination of 167 employees, including 114 Muslim staff members, citing internal decisions and restructuring.  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shani Shingnapur Trust : श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय; 167 जणांना कामावरून हटवलं, 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश!

Shani Shingnapur Trust fires 167 employees : नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टला सकल हिंदू समाजाने मुस्लिम कर्मचाऱ्यांना हटवण्यासाठी मोर्चाचा इशारा दिला होता.

Pradeep Pendhare

Shani Shingnapur Trust Decision on Muslim Workers : अहिल्या नगर जिल्ह्यातील नेवासा येथील शनिशिंगणापूरच्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टने 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह 167 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करताना, त्यांचा धर्म हा मुद्दा न करता कामात अनियमितता असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टकडे 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची मागणी केली गेली होती. त्यासाठी मोर्चाचा इशाराही देण्यात आला होता. मोर्चा येण्यापूर्वीच श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टने कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये 114 मुस्लिम (Muslim)कर्मचारी कसे काय असा आक्षेप सकल हिंदू समाजातर्फे घेण्यात आला होता. यासाठी 14 मार्चला आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यापूर्वीच देवस्थानाने कारवाई केली. ज्या मुस्लिम कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली ते कर्मचारी देवस्थानच्या थेट नियुक्तीवर नव्हते.

श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट मधील 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह 167 जणांवर केलेल्या कारवाईमध्ये ट्रस्टच्या कृषी, कचरा आणि शाळा समितीच्या व्यवस्थापनामध्ये कार्यरत होते, अशी माहिती पुढे आली आहे. यातील 100 पेक्षा जास्त कर्मचारी कामावर देखील येत नव्हते. या कर्मचाऱ्यांचा पगार देखील थकलेला आहे, असे श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टकडून सांगण्यात आले.

मुस्लिम कर्मचाऱ्यांचा मुद्दा हा मे महिन्यात पेटला होता. शनी चौथर्‍यावर मुस्लिम कर्मचारी काम करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून या मुद्द्याला वेगवेगळ्या पद्धतीने सकल हिंदू समाजाच्यातर्फे चर्चेत आणला जात होता. महाराष्ट्र मंदिर महासंघाने यावर आक्रमक भूमिका मांडली होती.

यानंतर ह्या मुद्द्यावरून भाजपचे अध्यात्मिक आघाडी देखील आक्रमक झाली होती. अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहर मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप देखील मुद्द्यावर आक्रमक झाले. यानंतर शनैश्वर देवस्थान ट्रस्ट शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उचलत या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह 167 कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईत अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT