Shankarrao Gadakh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar Political News : शंकरराव गडाख वेधणार राज्य सरकारचे लक्ष !

Pradeep Pendhare

- प्रदीप पेंढारे

Nagar Political News : नाथसागर (जायकवाडी) जलाशयावर राज्य शासनाने तरंगता सौरऊर्जा नियोजित केला आहे. या प्रकल्पामुळे नेवासा तालुक्यातील तसेच छत्रपती संभाजीनगरमधील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने या प्रकल्पाला त्यांचा विरोध आहे. त्यांच्या या विरोधाला शिवसेनेचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी पाठिंबा दिला असून, या विरोधात राज्य शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून लढा द्यावा लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले. नाथसागर जलाशयातील सुमारे 15 हजार हेक्टर क्षेत्रावर तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा घाट घातला जात असून, त्यासाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या शासकीय संस्थेच्या माध्यमातून जिओ सर्व्हिसेस मेरिटाईम प्रायव्हेट लिमिटेड या एजेन्सीमार्फत सर्व्हे सुरू आहे.

हा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यास या जलाशयातील मासेमारी पूर्णतः बंदी येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारीवर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या लाखो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असते. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रेडिएशन तयार होऊन त्याचा या परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावरदेखील विपरीत दुष्परिणाम होऊ शकतो.

शिवाय या जलाशयात वर्षातून चार वेळा प्रजनन क्षमता असलेल्या चिलापी जातीच्या माशांची उत्पत्ती प्रचंड प्रमाणात वाढू शकते. तरंगता सौरऊर्जा प्रकल्पामुळे मासेमारीवर बंधने आल्यास चिलापी माशांची पैदास बेसुमार वाढून इतर जातीच्या माशांसह सर्वच जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न उद्भवणार आहे. याकडे मच्छीमारांनी आमदार शंकरराव गडाख Shankarrao Gadakh यांचे लक्ष वेधले.

जायकवाडी Jayakwadi पक्षी अभयारण्यातील पक्षांचे खाद्य हेच चिलापी माशांचे प्रमुख अन्न असल्याने मासेमारी बंद झाल्यास या पक्षांचे अस्तित्वदेखील धोक्यात येईल. जलाशयातील प्रदूषण वाढल्याने हे पाणी मानवी आरोग्य तसेच सिंचनासाठी घातक ठरण्याचा धोका असल्याचे मच्छीमारांनी आमदार गडाख यांना सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाथसागर जलाशयाचा पाणीसाठा 36 हजार हेक्टर क्षेत्रावर पाणीसाठा होत असला तरी यातील 70 टक्के पाणीसाठा वापरला जात असल्याने दरवर्षी जून महिन्याच्या अखेरीस फक्त 30 टक्के मृतसाठा शिल्लक राहतो. यामुळे धरणातील पाणी झाकले जाऊन या पाण्यास गटारीचे स्वरूप येऊन रोगराई वाढून निसर्गावर याचा धोकादायक परिणाम होईल.

Edited By : Amol Sutar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT