Shankarrao Gadakh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shankarrao Gadakh on Vikhe Thorat Alliance : विखे-थोरातांच्या एकीने अनेकांच्या अडचणी वाढल्या! शंकरराव गडाख नेमकं कुणाला म्हणाले?

Shankarrao Gadakh reacts to the Vikhe-Thorat alliance in Ahilyanagar DCC Bank election, saying their unity reduced political conflict and will benefit farmers : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणावर गडाख यांची जाहीर प्रतिक्रिया; 'संघर्ष कमी झाला, शेतकऱ्यांचा फायदा होणार' असेही स्पष्ट केले.

Pradeep Pendhare

Vikhe Thorat Political Alliance : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात एकत्र आले आहेत. विखे पाटील-थोरात यांच्या एकत्र येण्यावर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी जाहीरपणे टिप्पणी केली आहे.

"सहकार जिल्ह्यातील टिकवण्यासाठी विखे पाटील-थोरात एकत्र आल्याने संघर्ष कमी झाला. त्यामुळे जरी अनेकांच्या अडचणी वाढल्या असल्या, तरी त्यांच्या एकत्र येण्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे," असे माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी म्हटले.

नेवाशातील चांदा येथे माजी मंत्री शंकरराव गडाख मित्र मंडळ आणि जिल्हा बँकेचे (DCC Bank) नवनिर्वाचित संचालक कारभारी जावळे मित्र मंडळाच्यावतीने दिवाळीनिमित्त स्नेहमेळावा आयोजित केला होता. त्यावेळी माजी मंत्री गडाख यांनी विखे पाटील-थोरात यांच्या एकत्र येण्यावर टिप्पणी केली.

माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) म्हणाले, "ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात भेटण्यासाठी सर्वच नेतेमंडळी येत होती. गडाख साहेबांचे सहकारातील योगदान महत्त्वाचे आहे, हे जिल्ह्याने पाहिले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे पाटील-थोरात एकत्र येतील, असे कुणालाही वाटले नाही. मात्र, ते एकत्र आल्यामुळे संघर्ष कमी झाला. सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना आनंद झाला, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल."

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असा पहिला प्रस्ताव ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी ठेवला होता. यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील अमृतकुटी येथे बिनविरोधच्या दिशेने पहिली बैठक झाली. या बैठकीला आताचे बँकेचे अध्यक्ष माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर विखे पाटील-थोरात सहमती एक्स्प्रेस बँकेत जोरात धावली सत्तेत विराजमान झाली.

बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील, तर बँकेच्या उपाध्यक्षपदाची माळ थोरातांचे जावई रणजितसिंह देशमुख यांच्या गळ्यात पडली. या निवडणुकीत सभापती प्रा. राम शिंदे यांनी एन्ट्री घेत, रंग भरला. जिल्हा बँकेत त्यांच्या समर्थकांनी दोन जागा पटकवल्या. प्रा. राम शिंदे यांनी सुरूवातीला जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात जोरदार वातावरण निर्मिती केली होती.

राम शिंदे-गडाख यांची भेट चर्चेत

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार नीलेश लंके, काँग्रेसचे सीताराम गायकर यांची सभापती प्रा. राम शिंदे यांनी भेट घेतली होती. राम शिंदे यांनी गडाख यांची भेट घेतल्यानंतर, विखे पाटील पिता-पुत्रांनी भेट घेत होती. या घडामोडी चर्चेत आल्या होत्या. संगमनेरच्या बिनविरोधच्या पहिल्या बैठकीनंतर, गडाख यांच्या आमराईत विखे पाटील-थोरात यांच्यात झालेली बैठक देखील चर्चेत होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT