Ahilyanagar MLA Sangram Jagtap : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावरून राज्यात वेगवेगळे खुलासे होत आहेत. यातून राज्याच्या राजकारणात राजकीय धुरळा उडत आहे. शरद पवार अन् अजित पवार यांच्या बैठकांचे व्हिडिओ, फोटो समोर येत आहे.
दोन्ही बाजूच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यावर चर्चा-प्रतिक्रिया येत असतानाच, अहिल्यानगरमधील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी पवार कुटुंबियांच्या या बैठकीवरच शंका करणारी प्रतिक्रिया समोर आली आहे.
आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) म्हणाले, "विलीनीकरणाच्या चर्चा होत असेल! राष्ट्रवादी, अजितदादांच्या मागे जी उभी होती, त्याच्यामध्ये एकही माणसाला माहिती नसावं. एकही आमदार, एवढी लोकं आहेत, त्यांना माहिती नसावं. सत्तेत सहभागी असलेल्या इतर दोन पक्ष आहेत, त्यांनाही माहित नसावं. यांनाच एकट्यांना माहिती." जे काही दाखवलं जात आहे आमचे बैठक झाली, कुठेतरी व्हिडिओ दाखवला जात आहे, अशा बैठका रोज कुठल्याही कुठे होत असतात, कुटुंब सदस्यांच्या होत असतात, असे म्हणत दोन्ही पवारांच्या बैठकीवर आमदार जगताप यांनी शंका उपस्थित केली.
'आज एकही माणसाला, तिन्ही पक्षाला माहिती नाही. चला तिन्ही पक्षांना माहित नाही. परंतु अजितदादा (Ajit Pawar) बरोबर असलेल्या कोणत्याही आमदाराला माहित नाही, कोणालाही माहित नाही असं होऊ शकत नाही. घटना घडवून अजून 24 तास झालेले नाहीत, लगेच कुठेतरी सुरू करायचं की दादांचं असं होतं, विलीनीकरण करा. हे अत्यंत चुकीचा आहे. घटना समोर काय घडली! अचानक घटना घडली असून आणि दादा आपल्यातून निघून गेले आहेत,' याकडे संग्राम जगताप यांनी लक्ष वेधलं.
संग्राम जगताप यांनी, अजितदादांची मुख्यमंत्रीपदावर संधी असताना, ती कशी यांनी घालवली, याकडे लक्ष वेधताना, 2004 मधील हा मुद्दा उकरून काढला आहे. अजितदादांची 2004 साली मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. तसं विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वात जास्त आमदार होते. नैसर्गिकरित्या संधी देखील मिळायला पाहिजे होती. पण अजितदादांची ती इच्छा पूर्ण केली गेली नाही. त्यात काही जणांनी उलट-सुलट चर्चा केल्या. तीच लोक आता अजितदादाची इच्छा असल्याचे सांगत आहे, असा चिमटा देखील काढला.
संग्राम जगताप यांची ही भूमिका म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाविरोधात असल्याचे संकेत आहेत. अजितदादांच्या दुर्दैवी निधनाला काही तास झाले नाही, तोच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षत्राकडून विलिनीकरणाच्या चर्चा होणे हे दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.
दोन्ही पवारांमध्ये झालेल्या बैठकांच्या व्हिडिओ, फोटोवर, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून काहीच बोलण्याचा आदेश दिला आहे. यातच आमदार संग्राम जगताप यांनी, या बैठकांवर शंका उपस्थित करत, अशा बैठका होत असतात, याचा अर्थ विलिनीकरणासंदर्भ घेण्याचं कारण नाही, अशी भूमिका मांडून राज्याचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केल्याचा दिसतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.