Sharad Pawar, Narendra Modi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar On Modi : '' देशात सध्या मोदींचं राज्य, पण त्यांनी नऊ वर्षांत काय केलं, तर पक्ष फोडले अन्....'', शरद पवारांचा हल्लाबोल

Deepak Kulkarni

Jalgaon : आता देशात मोदीसाहेंबाचं राज्य आहे. नऊ वर्षांत त्यांनी काय केलं. तर इतर पक्ष फोडले. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. हेच काम त्यांनी केलं. आणि दुसरीकडे हातातील सत्ता लोकांसाठी वापरण्याऐवजी ईडी, सीबीआय, या तपासयंत्रणामार्फत खोटे खटले भरले. विरोधकांना तुरुंगात टाकले. सत्तेचा गैरवापर त्यांनी केला असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

जळगावात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली. या सभेत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. पवार म्हणाले, आज ज्या भाजप(BJP)वाल्यांच्या हातात देशाची आणि राज्याची सूत्रे आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या दु:खाबद्दल यत्किंचितही आस्था नाही. दुष्काळग्रस्तांबद्दल प्रेम नाही, धरणाधरणावर पाणी नाही, त्याची चिंता नाही. ठिकठिकाणी टॅंकरने प्यायची अवस्था झाली,त्याची काळजी नाही. याचा अर्थच चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेली आहे. महाराष्ट्र असो किंवा इतर राज्य असो बेकायदेशीररित्या सर्वसामान्य लोकांवर अन्याय केला जात आहे असेही पवार म्हणाले.

पवार म्हणाले, शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यात पंधरा दिवसांत २० लोकांनी आत्महत्या केली. शेतकरी कष्ट करणारा, घाम गाळणारा, तो लोकांच्या भुकेचा प्रश्न सोडवणारा. तो जर आत्महत्येच्या मार्गावर जातो याचा अर्थ त्याच्या पुढची संकटे कमी केली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठिशी सामूहिक शक्ती उभी करण्याची गरज आहे.

काँग्रेसचं पहिलं ग्रामीण भागातलं अधिवेशन खानदेशात...

महाराष्ट्राचा इतिहास जर पाहिला तर खानदेशाचा इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासाचा अत्यंत अभिमानाचा असल्याचे दिसून येते. येथे आलो तर बहिणाबाई चौधरी, रान कवी ना. धो. महानोर, सानेगुरुजी, खानदेशाचा इतिहास समृध्द करण्यासाठी मोलाची कामगिरी केली. देशाच्या स्वातंत्र्याआधी काँग्रेसची अनेक अधिवेशनं झाले. पण काँग्रेसचं पहिले ग्रामीण भागातलं अधिवेशन खानदेशात झालं. त्यात स्वत: महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, मौलान आझाद आल्याचेही त्यांनी सांगितले.

एकेकाळी संबंध देशात आणि देशाबाहेर एक नंबरची केळी ही खानदेशातून जात होती. तसेच उत्तम शेतीचा आदर्श लोकांना पाहायला मिळत होता. एकप्रकारे दुष्काळाचं संकट आहे. शेतकरी अडचणीत आहे. पाणी नाही, पाण्याचे साठे कमी झाले. धरणात पाणी नाही, दुहेरी पीक पेरणी केली. पण ती पडली. देशाला एक नंबरचा कापूस देणारा हे राज्य, जिल्हा अडचणीत संकटात आहे. ही स्थिती बदलायची आहे. पण हे चित्र एकदम बदलू शकत नाही. पण आपल्या हातातील सत्ता या लोकांसाठी वापरली तर केला तर हे चित्र नक्की बदलू शकते असेही पवार म्हणाले. (Latest Marathi News)

शरद पवारां (Sharad Pawar) नी एक जुना राजकीय प्रसंग सांगताना म्हणाले, १९८४ - ८५ ला राज्यात अशीच अवस्था होती. त्यावेळी आम्ही जळगाव ते नागपूर पायी दिंडी काढली. पहिल्या दिवशी त्यात दहा लोक होते आणि शेवटी दीड लाख लोक नागपूरला अधिवेशनात धडकले. अशी आठवणही पवार यांनी सांगितली. शेतकरी हा लाचार नाही, भीक मागत नाही. तो भेकड नाही. पण तो जे कष्ट करतो त्याची किंमत मागतो. आणि ही किमत जर मिळत नसेल तर तो संघर्ष करतो असा इतिहास खानदेशाने घालून दिला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT