MadhyaPradesh Election 2023 : मध्य प्रदेशात भाजपा १५० जागा जिंकणार..; अमित शाहांनी फुंकले रणशिंग

Amit Shah News: भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेच्या उद्घाटनासाठी अमित शाह आज मंडला येथे दाखल झाले
Madhya Pradesh Election 2023 :
Madhya Pradesh Election 2023 :Sarkarnama
Published on
Updated on

MadhyaPradesh Politics: भारतीय जनता पार्टी 150 हून अधिक जागा जिंकून मध्य प्रदेशात सरकार स्थापन करेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक केला आहे. मध्यप्रदेशातील मांडला येथील जनआशीर्वाद सभेला संबोधित करताना त्यांनी हा दावा केला आहे. आगामी काळात मध्यप्रदेशसह देशातील पाच राज्यांचा विधानसभा निवडणुका होत आहेत. मध्य प्रदेशातील मंडला आणि श्योपूर येथून आज भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. या माध्यमातून भाजपाने एक प्रकारे प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, बिमारू म्हणजेच, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश मध्ये भाजपाने अद्वितीय कामगिरी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली 25 सप्टेंबर रोजी भोपाळमध्ये पाच जनआशीर्वाद यात्रांची सांगता होईल. त्याच दिवशी मध्य प्रदेशात कोणाचे सरकार येईल, हे निश्चित होईल. पुढच्या वेळीही 150 जागांसह भाजपा पुन्हा सरकार स्थापन करेल.

Madhya Pradesh Election 2023 :
Eknath Khadse News : पवारांसमोर खडसेंची जोरदार फटकेबाजी ; फडणवीसांवर वार, अजितदादांना टोला

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेच्या उद्घाटनासाठी अमित शाह आज मंडला येथे दाखल झाले." या वेळी पुन्हा भाजपाचे सरकार बहुमताने स्थापन होईल. जनआशीर्वाद यात्रेला राज्यातील जनतेचे प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. भाजप सरकारच्या धोरणांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे या जनसमुदायावरून दिसून येते.

पाचही जनशीर्वाद यात्रा संपल्यावर २५ सप्टेंबर रोजी राजधानी भोपाळमध्ये भव्य कार्यक्रम होणार असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत त्याच दिवशी तुमच्या आशीर्वादाने मध्य प्रदेशात 150 जागांवर विजय मिळवून भाजपचे सरकार स्थापन करेल, हे निश्चित होईल. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजप मध्यप्रदेशच्या प्रत्येक विधानसभेत राज्याच्या गरीब कल्याणकारी योजना आणि विकास धोरणांचा आशीर्वाद मागत आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com