Manoj jarange Patil, Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar : कवडीचाही संबंध नाही..जरांगेंच्या आंदोलनावर शरद पवारांचा मोठा खुलासा

Sharad Pawar’s big revelation on Jarange agitation : अनेकदा शरद पवार यांच्या सांगण्यावरुन मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणावर आंदोलन करत असल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला आहे.

Ganesh Sonawane

Sharad Pawar : मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या दोन वर्षांपासून मराठा आरक्षणावरुन राज्यभरात रान पेटवलं आहे. जरांगेच्या या आंदोलनाविषयी वेगवेगळे दावे केले जात असताना त्यांच्या आंदोलनाचा संबंध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जोडला जातो. जरांगे हे शरद पवारांच्या इशाऱ्यावर काम करतात असा आरोप महायुतीतील नेत्यांकडून वारंवार केला जातो. मात्र आता शरद पवार यांनीच याबाबत मोठा खुलासा केला असून जरांगे यांच्या आंदोलनाशी आमचा कवडीचाही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर असून माध्यमांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं. पवार म्हणाले, कुणी काहीही म्हणत असले तरी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनाशी आमचा कवडीचाही संबंध नाही. हे आरोप सत्यावर आधारित नाहीत त्यामुळे त्यावर बोलण्याची गरज नाही. महाराष्ट्र हा सामाजिक ऐक्य जपणारा प्रदेश असून ते महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. परंतु या ऐक्याला तडा बसतोय अशी चिंता शरद पवार यांनी बोलून दाखवली.

शरद पवार पुढे म्हणाले की, दोन समाजात कटुता निर्माण होणार नाही ही काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रित चर्चा करून योग्य तो मार्ग काढला पाहिजे. हे याच्यासाठी, ते त्याच्यासाठी असे करणे सरकार म्हणून हे योग्य नाही. सरकार हे काही एका जातीचे किंवा समाजाचे नाही. वेगवेगळ्या समाजाच्या समित्या बनवल्या जात आहेत. या समित्यांच्या नियुक्त्या करताना व्यापक दृष्टिकोन ठेवायला हवा. एकच समिती असावी असे माझे म्हणणे नाही. परंतु एका जातीची कमिटी नको असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

दरम्यान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादात घेतलेल्या भूमिकेवरुनही पवारांनी भुजबळांना सल्ला दिला आहे. समाजा-समाजात अंतर वाढेल असे भाष्य करणे योग्य नाही असा सल्ला शरद पवारांनी भुजबळांना दिला. आम्हाला सामाजिक ऐक्य हवे आहे. त्यासाठी काही व्यापक कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न आम्ही करू, आम्हाला एका जातीचे राजकारण जमत नाही असा चिमटा पवारांनी काढला.

दरम्यान नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ता शिबीर सुरु आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या शिबीरासाठी पवार स्वत:नाशिकमध्ये आले आहेत. त्यांच्या नेतृत्वात उद्या नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रोश मोर्चा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT