NCP Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Video NEET Exam Scam : 'नीट' परीक्षा घोटाळा प्रकरणी शरद पवार गट आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती!

NEET Exam 2024 : नीट परीक्षा घोटाळ्याची सखोल चौकशी करून कारवाई केली जावी, अशी मागणी करत सादर केले निवेदन

Sampat Devgire

NEET Exam and NCP Sharad Pawar Group : देशभर गाजत असलेल्या 'नीट' परीक्षा प्रश्नपत्रिका गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसची विद्यार्थी आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

नीट परीक्षेच्या घोटाळ्यावरून देशभर युवक संतप्त आहेत. या परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत गुजरात कनेक्शन उघडकीस आले आहे. या संदर्भात केंद्र शासनाने स्पष्ट भूमिका घेण्याचे का टाळले? यामध्ये सत्ताधारी पक्षाला काय रस आहे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी आघाडीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. कारवाईसाठी निवेदन देण्यात आले. केंद्र शासनाचा या परीक्षेची थेट संबंध आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन आणि या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. तरीही संबंधित यंत्रणा खुलासा करण्यासाठी पुढे आलेली नाही. अशी तक्रार यावेळी करण्यात आली.

यामध्ये लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. उत्तर वगळल्यास या परीक्षेत चार गुण कमी होतात. चुकीचे उत्तर दिल्यास पाच गुण कमी होतात. अशा स्थितीत 718 आणि 719 गुण मिळणे शक्य आहे काय? असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी केला.

हरियाणातील एका केंद्रावर सात विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले आहेत. प्रतिवर्षी या परीक्षेत 100 टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी असतात. मात्र यंदा 67 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. यात निश्चितच घोटाळा झाल्याचा संशय येतो.

याची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हा अध्यक्ष ॲड तुषार जाधव, शहराध्यक्ष भावनेश राऊत, दीपक वाघ, करण आरोटे, चेतन सांगळे, अक्षय मोरे, प्रशांत पगारे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

(Ediyted by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT