NCP Leader Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik NCP Executive : शरद पवार गटाची नाशिकमध्ये निवडणूक मोर्चेबांधणी; नव्या शिलेदारांकडे राष्ट्रवादीचे सुकाणू

Sharad Pawar Group News : आगामी निवडणुकीत दोन गटांतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राज्यातील पहिला दौरा छगन भुजबळ यांच्या येवल्यात झाला होता. विशेष म्हणजे कार्यालयावरून अजित पवार आणि शरद पवार गट आमने सामने आले होते. बंडखोरांसह भाजपविरोधात लढण्यासाठी पवारांनी डावपेच आखायला सुरुवात केली असून शरद पवार गटाने तालुकाध्यक्षांची नेमणुका करत आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन गटांतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. (Sharad Pawar group announced Nashik's NCP executive)

लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका येत्या काळात होणार आहेत, त्यादृष्टीने या नियुक्त्या केल्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्त केलेल्या कार्यकारिणीत नाशिक तालुकाध्यक्षपदी रामकृष्ण झाडे, येवला येथे विठ्ठल कारभारी शेलार, दिंडोरीला भास्कर मुरलीधर भगरे, मनमाड येथे सुधीर विश्वासराव पाटील, मालेगावला संदीप अशोक पवार, नांदगावला महेश महेंद्र साहेबराव बोरसे, कळवणला संतोष मुरलीधर देशमुख, देवळा येथे पंडित सखाराम निकम, चांदवड येथे प्रदीप नारायण गायकवाड, चांदवड शहराच्या अध्यक्षपदी प्रकाश वसंतराव शेळके, तर सिन्नरला संजय कचरू सोनवणे आणि निफाड येथे दिलीप तुकाराम मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक शहराची कार्यकारिणीही जाहीर झाली आहे. यात शहराच्या सरचिटणीसपदी मुन्नाभाई अन्सारी, तर नाशिक पश्चिम विधानसभेच्या अध्यक्षपदी धनंजय राहणे, पूर्व विभागाच्या अध्यक्षपदी फरीद शेख व नाशिक रोडच्या विभागीय अध्यक्षपदी अशोक पाटील यांची निवड झाली आहे.

नाशिक शहराच्या दृष्टीने सिडको विभागाच्या अध्यक्षपदी विजय मटाले, तर सातपूर विभागाचे अध्यक्षपदी प्रवीण नागरे यांची नियुक्ती झाली आहे. पंचवटी विभागीय कार्याध्यक्षपदी संतोष जगताप व सिडको विभागाच्या कार्याध्यक्षपदी कृष्णाकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून नियुक्त्यांचा भडीमार सुरू आहे. नाशिक लोकसभेच्या कार्याध्यक्षपदी कोंडाजीमामा आव्हाड, माजी नगरसेवक गजानन शेलार तसेच गोकुळ पिंगळे यांच्या गटाने शरद पवार यांना साथ दिली. शेलार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, तर कोंडाजी आव्हाड यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद आहे. तालुकानिहाय बैठका घेऊन २९ ऑगस्टला तालुकाध्यक्षांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आली. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाने देखील विविध नियुक्ती जाहीर करून नियुक्त पत्र देखील वाटप केले आहे.

झेडपीच्या निवडणुकीत कस लागणार

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. नाशिक जिल्हा परिषदेत एकूण ७३ सदस्य निवडले जातात. त्यापैकी अर्ध्यावर सदस्य हे राष्ट्रवादीचे असतात, तर उर्वरित शिवसेना, भाजप, माकप या पक्षांच्या सदस्यांना मिळून सत्तेचे समिकरण आखले जाते. मात्र, शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला व काँग्रेसला काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT