Eknath Shinde News : फॉर्म्युला ठरला ; अजितदादा-फडणवीस-मुख्यमंत्री शिंदे असा असेल फायलींचा प्रवास ; वित्त विभागाने नाकारलेल्या...

Maharashtra Politics : निधीवाटपावरून शिंदे गट-भाजपच्या आमदारांकडून येणाऱ्या तक्रारी टाळण्यासाठी शिंदे यांनी हा फॉम्युला ठरविला आहे.
Maharashtra Politics news
Maharashtra Politics news Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार हे आमदारांना विकास निधी देतांना आपल्या आमदारांना बळ देतील, आणि आपली कोंडी होईल, अशी भीती शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोलून दाखविली होती. अजितदादांवरील आमदारांची नाराजी टाळण्यासाठी अजितदादांनी नाकारलेल्या फाईल फडणवीसांकडून आपल्याकडे पाठवाव्यात, असा आदेश शिंदेंनी प्रशासनाला दिला आहे. (Latest Marathi News)

अर्थखाते आपल्याकडे आल्यावर अजितदादांनी आपण तीन पक्षांमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्वच मतदारसंघाना न्याय देऊ अशी हमी दिली आहे, मात्र निधीवाटपावरून शिंदे गट-भाजपच्या आमदारांकडून येणाऱ्या तक्रारी टाळण्यासाठी शिंदे यांनी हा फॉम्युला ठरविला आहे.

Maharashtra Politics news
Swabhimani Shetkari Sanghatana News : 'स्वाभिमानी'चे प्रशांत डिक्कर उपोषण मंडपातून बेपत्ता ; प्रशासनाची धावपळ

फडणवीस आणि अजितदादांचे घनिष्ठ संबध असल्याने या फॉर्म्युलाचा फायदा होईल, असे मानले जात आहे. अजितदादांवर निर्माण होणाऱ्या संभाव्य नाराजीवर उपाय म्हणून आणि निधीवाटपात संतुलन राहावे यासाठी आता वित्त फायलींचा प्रवास अजित पवार-फडणवीस-मुख्यमंत्री शिंदे असा ठरला आहे.

वित्त विभाग आपल्या कामात हस्तक्षेप करीत असल्याच्या तक्रारी काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्याकडे केल्यानंतर शिंदे यांनी मंत्रालयातील फायलीचा प्रवास निश्चित करताना त्या फडणवीस यांच्यामार्फत आपल्याकडे याव्यात, अशा सूचना मुख्यसचिवांना दिल्या आहेत.

Maharashtra Politics news
Balaji Kinikar News : उल्हासनगरमध्ये शिवसेना आमदार अन् राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकामध्ये खडाजंगी

त्यानुसार मंत्रिमंडळासमोर येणारे प्रस्ताव, कराबाबतचे प्रस्ताव, मूल्य निर्धारण, नवीन कर्ज काढणे, विधिमंडळात मांडावयाची विधेयके, महसुली उत्पन्नाचे प्रस्ताव, चौकशी समित्यांचे अहवाल राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा असल्याचे सांगत वित्त विभागाने नाकारलेले अशा प्रस्तावाच्या फाईल यापुढे उपमुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त) यांच्यानंतर उपमुख्यमंत्री तथा मंत्री (गृह, विधि व न्याय) यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी पाठवावेत, अशा सूचना मुख्य सचिवांनी सर्व विभागाच्या सचिवांना दिल्याआहेत.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com