Shriram Shete Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar NCP : दिंडोरीसाठी आघाडीत भाऊगर्दी, पण उमेदवारीचे निकष ठरले; श्रीराम शेटेंनी वाढवली इच्छुकांची धडधड

Nashik Mahavikas Aghadi : ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्या उपस्थितीत दिंडोरी विधानसभेच्या इच्छुकांचा झाला मेळावा

Sampat Devgire

Dindori Political News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे भाजपच्या मंत्री भारती पवार यांचा पराभव करून जायंट किलर ठरले. दिंडोरीत मोठे यश मिळाल्यानंतर शरद पवार गटासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त केली आहे.

मात्र जनमाणसात जाऊन काम करणारा आणि सर्वेक्षणाच्या माध्यमातूनच उमेदवारीची घोषणा केली जाणार असल्याचे शरद पवार Sharad Pawar गटाचे नेते श्रीराम शेटे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दिंडोरीतील इच्छुकांची आता धडधड वाढली आहे.

महाविकास आघाडीला दिंडोरी मतदारंघात मोठी आघाडी मिळाली. मात्र, तरीही आघाडीचे नेते जमिनीवर आहेत. असे नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत दिसले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी Dindori मतदारसंघाची बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी काय धोरण राबवावे यावर चर्चा झाली. निवडणुकीत इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मतदारांत जाऊन काम करावे, अशी सूचना यावेळी करण्यात आली.

आघाडीकडून या सर्व इच्छुकांचा मतदारसंघात जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेश्रणातील निष्कर्षानंतरच उमेदवारीचा विचार होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते श्रीराम शेटे यांनी स्पष्ट केले. शिटेंच्या या भूमिकेमुळे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची आता कस लागणार आहे.

आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. त्यासाठी नेते आणि पदाधिकाऱ्यांनी परस्परांतील समन्वय वाढवावा. सर्व इच्छुकांनी देखील एकत्रितपणे मतदारसंघात जाऊन काम करावे असे यावेळी ठरले.

या बैठकीत शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार रामदास चारोस्कर आणि भास्कर गावित तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संतोष रेहरे आणि आदिवासी संघटनेचे राज्यस्तरीय नेते अशोक बागुल हे चार उमेदवार इच्छुक आहेत. त्यांनी आपल्या पक्षाकडे दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे. या इच्छुकांबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळविण्यात आले आहे. मतदारांचा कल आणि उमेदवाराबाबत मतप्रवाह लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतला करण्यात आले.

या मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ Narhari Zirwal यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष सोडला आहे. झिरवाळ सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी कडून नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आणि दिंडोरीचे भास्कर भगरे मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काही काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने दिंडोरी मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

यावेळी खासदार भास्कर भगरे Bhaskar Bhagre, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, काँग्रेसचे सुनील आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दत्तात्रय पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन आहेर, प्रवीण जाधव यांचा विविध नेत्यांनी मार्गदर्शन केले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT