Sharad Pawar, Pusushottam Kadlak Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Leadership of Sharad Pawar : राष्ट्रवादी म्हणते, भुजबळ नव्हे तर शरद पवारांनाच नाशिक आपला नेता मानते..!

Sampat Devgire

Sharad Pawar Vs Chhagan Bhujbal :

नाशिक जिल्ह्यातील मतदार आणि आमदार कोणत्याही पक्षात असले तरीही आजही मनापासून फक्त शरद पवारांचे नेतृत्व मान्य करतात. छगन भुजबळ यांना कोणीच नेता मानत नाही. आगामी काळात हे पुन्हा स्पष्ट होईल. याबाबत केलेल्या सर्वेक्षणात हे निरीक्षण आढळल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक यांनी केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्ह्यात मतदारसंघनिहाय बैठका सुरू आहेत. यासंदर्भात विविध नेत्यांना आणि पक्षापासून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांना एकसंध करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांचे नेतृत्व सिद्ध होईल, असा दावा कडलक यांनी केला आहे.

शरद पवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष नावारूपास आला. त्यांनी हा पक्ष स्थापन केला आहे. हा पक्ष आणि त्याचे चिन्ह पळवून काही नेत्यांना आपण खूप मोठे काम केल्याचे वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत हा भ्रम दूर करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत, असा दावा कडलक (Purushottam Kadlak) यांनी केला आहे.

कडलक म्हणाले, माझगाव विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळांचा (Chhagan Bhujbal) पराभव झाला. त्या मतदारसंघात त्यांचं अस्तित्व संपल्यावर मध्यंतरीच्या काळात विधान परिषद आणि नंतर येवला मतदारसंघात फक्त शरद पवार यांच्यामुळेच भुजबळ स्थिरावले, पण त्यांनी आतून डिव्हाइड आणि रुल या फंड्याचे राजकारण केले. पक्षात शरद पवारांचं नेतृत्व मानणाऱ्या नेत्यांना संपवलं, असा आरोप कडलक यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2003 ते 2014 या कालावधीमध्ये माजी आमदार डॉ. वसंतराव पवार, देविदास पिंगळे यांच्यासह अनेक नेत्यांना त्यांनी त्रास दिला. पवार गटाच्या आमदारांना पराभूत करण्याचे काम पडद्याआडून केलं. दिलीप बनकर आणि माणिकराव कोकाटे हे त्याचं उदाहरण आहे. यामुळे कोणीही स्वाभिमानी कार्यकर्ता आणि नेता छगन भुजबळ यांच्या फार्महाऊसवर गेला नाही, जाणारही नाही.

आजही जिल्ह्यातील कोणताही आमदार भुजबळ यांना नेता मानत नाही. तो मनातून शरद पवार यांनाच नेता मानतो. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत याबाबतचे चांगले राजकीय चित्र स्पष्ट होईल, असा दावा त्यांनी केला.

शेतकऱ्यांचे कांदा, द्राक्ष असे कोणतेही प्रश्न असो, आदिवासींच्या समस्या असोत शरद पवारांनी नेहमीच नाशिकच्या प्रश्नांमध्ये मनापासून लक्ष घातले. अनेक प्रश्न सोडवले. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग या जिल्ह्यात आहे, हे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.

शरद पवार यांना जिल्ह्यातील मतदार आणि अगदी लोकप्रतिनिधीदेखील नेते मानतात, हे आढळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नव्या पिढीला बरोबर घेऊन शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आगामी काळात प्रबळ झालेली दिसेल, असा दावाही त्यांनी केला.

(Edited by Avinash Chandane)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT