Chhagan Bhujbal News : आमचं होतं घड्याळ अन् लोक पंजावर शिक्का मारायचे, आता जमाना बदलला; तुतारीवर भुजबळ म्हणाले...

Chhagan Bhujbal On Sharad Pawar Party : भुजबळ म्हणाले, चिन्ह बदलले की परिणाम होतोच पण…
Chhagan Bhujbal On Sharad Pawar Party Symbol
Chhagan Bhujbal On Sharad Pawar Party SymbolSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाला 'तुतारी घेतलेली व्यक्ती' हे नवे पक्ष निशाण मिळाले आहे. तुतारी निशाणीचे स्वागत करताना शरद पवार गटाने सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. त्यात या नव्या चिन्हाबाबत बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, "चिन्ह बदलले की मतदारांवर परिणाम होतोच. पण आता जमाना स्मार्टफोनचा आहे. मतदानावर परिणाम होईल, पण 1999 प्रमाणे त्याची तीव्रता राहणार नाही. ज्येष्ठ नेते भुजबळांनी केलेल्या वक्तव्यामुळे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावणार हे मात्र तेवढेच खरे! (Chhagan Bhujbal On Sharad Pawar Party)

Chhagan Bhujbal On Sharad Pawar Party Symbol
' योद्ध्याला शोभण्यासारखं चिन्ह मिळालं..' आव्हाडांनी व्यक्त केला आनंद | Jitendra Awhad On NCP |

आता स्मार्टफोनचे युग आहे. निवडणुकीत स्मार्टफोनचे अनन्यसाधारण महत्त्व असून, काही वर्षांपूर्वी पक्षाचे चिन्ह बदलले, की त्याचा मोठा परिणाम मतदानावर व्हायचा. स्मार्टफोनमुळे चित्र बदलले असून, लोकांपर्यंत पोहाेचणे सहज शक्य होते. अत्यंत दुर्गम भागात मोबाईलचा वापर कमी असल्यास तेथे मात्र पक्षावर परिणाम होतो, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. भुजबळांचा हा सल्ला शरद पवार अमलात कसा आणतात, याची चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhagan Bhujbal On Sharad Pawar Party Symbol
Kamal Nath On Rahul Gandhi : भाजप प्रवेशाच्या चर्चेतल्या कमलनाथ यांचे राहुल गांधींच्या नावाने जनतेला आवाहन; म्हणाले...

निवडणूक आयोगाने (Election) गुरुवारी हे नवे चिन्ह पक्षाला दिले. 1999 मध्ये काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही निवडणूक लढलो. त्यावेळी नवीन चिन्ह आम्हाला मिळाले होते. त्यामुळे अनेक भागात त्याचा फटका बसला. आम्हाला जास्त उमेदवार निवडून येण्याची शक्यता असल्याने चौकशी केली. आम्ही लोकांना विचारलं, की ते म्हणायचे आम्ही तर मतदान केले आहे. मग, उमेदवार पडलाच कसा? कोणत्या चिन्हाला मत दिलं असं विचारलं, की ते म्हणायचे पंजाला केलं. विशेषत: ग्रामीण भागात त्याचा मोठा फटका बसला. मात्र, आता जमाना बदलला आहे. स्मार्टफोनमध्ये पक्षाचे नाव व चिन्ह थेट मतदारांपर्यंत पोहाेचते. शहरी भागात वा ग्रामीण भागातसुद्धा मोबाईलचे चांगले नेटवर्क आहे. अगदीच फक्त चिन्हावरच निवडणुका पार पडतात, अशा दुर्गम भागांमध्ये अडचण येऊ शकते, असे भुजबळ म्हणाले.

दरम्यान, किल्ले रायगडावर नव्याने मिळालेल्या तुतारी चिन्हाचा अनावरण सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह महत्त्वाचे नेते-पदाधिकारी उपस्थित राहतील. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com