GS Mahanagar Bank Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

GS Mahanagar Bank : शरद पवार यांच्या विश्वासू सहकाऱ्याच्या बँकेत नणंद-भावजयीच्या पॅनलमध्ये सरळ लढत रंगणार

Sharad Pawar Loyalist Uday Shelke to Contest Election in Mumbai GS Mahanagar Co-op Bank : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू (कै.) गुलाबराव शेळके आणि (कै.) उदय शेळके यांच्या पश्चात जीएस महानगर बँकेत निवडणूक होत आहे.

Pradeep Pendhare

GS Mahanagar Sahakari Bank : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू (कै.) गुलाबराव शेळके आणि (कै.) उदय शेळके यांच्या पश्चात जीएस महानगर बँकेत निवडणूक होत आहे.

या निवडणुकीत नणंद-भावजयीच्या पॅनलमध्ये सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. बँकेतील संचालक मंडळाच्या 19 जागांसाठी 96 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशी होणार असेच दिसते.

(कै.) गुलाबराव शेळके व (कै.) उदय शेळके यांच्या पश्चात प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीमध्ये सुमन व स्मिता शेळके, तसेच (कै.) उदय शेळके यांच्या पत्नी गीतांजली शेळके यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. एक जूनला मतदान होणार असून, दोन जूनला मतमोजणी होणार आहे. मुंबईस्थित (Mumbai) जीएस महानगर सहकारी बँकेने 2023-24 आर्थिक वर्षात 34 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला, जो बँकेच्या इतिहासातील सर्वाधिक आहे.

सर्वसाधारण प्रवर्ग मतदारसंघात 14 जागांसाठी 62, इतर मागास प्रवर्ग (OBC) मतदारसंघातील 1 जागेसाठी 16, महिला राखीव प्रवर्ग मतदारसंघातील 2 जागांसाठी 12, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग मतदारसंघातील 1 जागेसाठी 3, भटक्या विमुक्त प्रवर्ग मतदारसंघातील 1 जागेसाठी 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 16 मे रोजी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत असून, त्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीस प्रारंभ होईल.

29 एप्रिलला अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर 30 एप्रिलला अर्जाची छाननी झाली, तर शुक्रवारी दुपारी छानणीनंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. छाननीमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात 20, इतर मागास प्रवर्ग मतदारसंघात 10 अर्ज बाद झाले. त्यामुळे माघारीनंतर कोण निवडणुकीत रिंगणात राहते याकडेही लक्ष लागले आहे.

अहिल्यानगरमधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय शेळके (वय 46) यांचे 11 फेब्रुवारी 2023 मध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे वडील गुलाबराव शेळके यांचेही निधन झालेले आहे. शेळके परिवार हा शरद पवार यांचा विश्वासू. मुंबई इथं शरद पवार यांच्या हस्ते ऑगस्ट 2024 मध्ये उदय गुलाबराव शेळके फाउंडेशनचे बोधचिन्ह आणि संकेतस्थळ अनावरण झालं होतं.

शरद पवारांची ताकद कोणाला मिळणार?

शरद पवार यांनी त्यावेळी सॉलिसीटर (कै.) गुलाबराव शेळके आणि त्यांचे चिरंजीव (कै.) उदय शेळके यांनी सहकारात दिलेल्या योगदानाची आठवणींना उजाळा दिला. या दोघांच्या पश्चात जीएस महानगर बँकेची धुरा संभाळत असलेल्या गीतांजली शेळके यांचे कौतुक करत बँकेविषयी कोणताही प्रश्न असेल, अडचणी असतील, तर मांडत चला, त्यावर मार्ग काढण्याचा नक्की प्रयत्न करेल, अशी शरद पवार यांनी ग्वाही दिली होती. आता बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी शेळके कुटुंबातील महिला आमने-सामने आल्या आहेत. नणंद-भावजयीच्या पॅनलमध्ये सरळ लढत होणार असल्याचे संकेत मिळत नसल्याने ही लढत लक्षवेधी होण्याची चिन्हं आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT