Radhakrishna Vikhe meets Amit Shah : सुजय विखे केंद्रात जाणार? अमित शाहांच्या भेटीनंतर मंत्री विखे पाटलांच्या 'राजकीय फिल्डिंग'ची चर्चा!

Ahilyanagar BJP Leaders Radhakrishna Vikhe and Sujay Vikhe Meet Amit Shah in Delhi : अहिल्यानगरमधील भाजप मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
Radhakrishna Vikhe meets Amit Shah
Radhakrishna Vikhe meets Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar BJP news : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने चौंडी (ता. जामखेड) इथं महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठकीची लगबग सुरू आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे नियोजनात व्यग्र असतानाच, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांनी मोठा डाव खेळला.

भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दिल्ली इथं विखे पिता-पुत्रांनी भेट घेतली. सुजय विखे यांनी त्यांच्या समाज माध्यमावर भेटीचे फोटो शेअर केल्याने वेगळ्याच चर्चेला तोंड फुटलं आहे. सुजय विखे केंद्रात जाणार अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

विखे पिता-पुत्रांनी अमित शाह (Amit Shah) यांची ही भेट त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत अहिल्यानगरच्या लोणी बुद्रुक येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरणासाठी अमित शाह यांना निमंत्रित करण्यासाठी ही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Radhakrishna Vikhe meets Amit Shah
Narayan Patil meets Ram Shinde : राम शिंदे राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत; पवारसाहेबांच्या आमदारानं घेतली भेट, बंद दाराआड दोघांमध्ये बरचं काही शिजलं

नवीन गाळप हंगाम सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून एनसीडीसी लोनमुळे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे नूतनीकरण करण्यात यावं, अशी मागणीही यावेळी करण्यात आल्याचे सांगितलं जातंय. या सर्व कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रमुख उपस्थिती लाभावी, अशी विनंती यावेळी विखे पिता-पुत्राने (Radhakrishna Vikhe) केली. याशिवाय अमित शाह यांनी देखील दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबद्दल सहमती दर्शवली आहे.

Radhakrishna Vikhe meets Amit Shah
Ajit Pawar Sharad Pawar BJP : अजितदादांचा शरद पवारांना थेट सवाल; 'भाजप का नाही?'

लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगर शहर मतदारसंघातून सुजय विखे यांचा पराभव झाला. तेव्हापासून त्यांनी राजकीय पुनर्वसनाची मागणी करत आहे. जिल्हा सहकारी बँकेच्यावतीने आमदार शिवाजी कर्डिले यांनी महायुतीच्या विजयी आमदारांचा सत्कार कार्यक्रमात सुजय विखेंनी राजकीय पुनर्वसनाची मागणीचा पुनरुच्चार केला होता.

विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी 'श्रद्धा अन् सबुरी'चा, तर शिवाजी कर्डिले यांनी तुम्ही आमच्यासाठी खासदारच आहात, असे सांगितले होते. यानंतर सुजय विखे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार अशी चर्चा आहे. महाराष्ट्रातून भाजप मंत्र्यांपैकी अमित शाह यांच्याशी सर्वाधिक जवळीक मंत्री विखे पाटील यांची असल्याचे म्हटले जाते. आताची भेट घेऊन अमित शाह यांनी लोणी इथं येण्याचं दिलेल्या आमंत्रणावरून विखे पिता-पुत्रांनी भविष्यात बरीच 'राजकीय फिल्डिंग' लागल्याचं सूचक सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com