Ahilyanagar political crime news : तरुणाचे अपहरण करून, त्याला डांबून ठेवत मारहाण केल्याप्रकरणी अन् बळजबरीने कोऱ्या नोटरीवर सह्या करून घेतल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर याच्यासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्याद देणारा तरुण हा पूर्वी अभिषेक कळमकर याच्या वाहनावर चालक म्हणून कार्यरत होता. दरम्यान, दाखल गुन्ह्यावर शरद पवार यांचे खासदार नीलेश लंके यांनी खळबळजनक दावा केल्याने, या प्रकरणाला वेगळं वळण येण्याची शक्यता आहे.
भिंगार कॅम्प पोलिस (Police) ठाण्यात दाखल गुन्ह्यात मच्छिंद्र झेंडे याला अटक करण्यात आल्याची माहिती सहायक निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी दिली. अभिषेक कळमकर याच्यासह एक महिला आणि आणखी दोघांची नावे नमूद करत इतर पाच अनोळखी व्यक्तींचा असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अपहरण, मारहाण ही सर्व घटना 12 ते 17 मे रोजी घडल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.
फिर्यादी हा दुचाकीवरून वाकोडी (ता. नगर) इथं गावाकडे जात होता. त्यावेळी मुठ्ठी चौकात मोटारीतून आलेल्यांनी त्यांना अडवले. मोटारीत बळजबरीने घेत, चिखली इथं मच्छिंद्र झेंडे यांच्या बंगल्यावर घेऊन गेले. तिथं मारहाण केली. दौंड रस्त्यावरील एका हाॅटेलमध्ये नऊन महिलेसोबत अन् एका महिलेसोबत छायाचित्र काढले. अहिल्यानगर शहरातील जुन्या न्यायालयासमोर (Court) नऊ कोऱ्या नोटरींवर सह्या करून घेतल्या. यानंतर 17 मे रोजी सासुरवाडीला सोडण्यात आले, असे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, माजी महापौर अभिषेक कळमकर अन् त्याचे चुलते माजी आमदार या तिघांसह आणखी एक स्वतंत्र अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. फिर्यादीच्या भावाने ही तक्रार दिली आहे. माजी महापौराने 14 मे रोजी घरी बोलावून घेतले, आमचे नुकसान केले, त्याचे पैसे दे, नाहीतर तुझी शेतजमीन विक अन् माझी नुकसान भरपाई करून दे, असे म्हणून शिवीगाळ केली, दमदाटी केली, जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या सर्व घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, "माजी महापौराविरुद्ध दाखल गुन्ह्याबाबत वेगळं चित्र उभं केलं जात आहे. ज्याने काही गुन्हा दाखल केला आहे, तो काही काळ माजी आमदार दादा कळमकर यांच्याकडे काम करत होता. चालक असताना, त्याने त्याचा वापर करून नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून पैसे घेतले. हा प्रकार उघडकीस आल्यावर, त्याला जाब विचारला. त्याला सांगितले की, तू ज्या लोकांकडून पैसे घेतले आहे, ते परत कर, त्याला कठोर शब्दात समज दिली, यावर अपहरण झाले असे म्हणता येणार नाही". पण एखाद्याला पैसेच बुडवायचे, आणि अशाप्रकारे गुन्हा दाखल करत असेल, तर चुकीचे आहे, पण पुढे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असे नीलेश लंके यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.