
Karjat local body elections : कर्जत नगरपंचायतीमध्ये बंडखोर गटनेते संतोष मेहत्रे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवडीनंतर विधान परिषदेचे भाजपचे आमदार तथा सभापती प्रा. राम शिंदे यांनी 13 डिसेंबर 2021ची मधील कृतीची काल 2025मध्ये केलेली पुनरावृत्ती चर्चेत आली.
राम शिंदेंची ही कृती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना सूचक इशारा दिला. 'आप समझदार हैं, सब कुछ समझते हो', असा तो इशारा असल्याची चर्चा कर्जत-जामखेडमध्ये रंगली आहे.
कर्जत नगरपंचायतीध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या गटाची सत्ता जाऊन भाजपचे राम शिंदे यांची संपूर्ण सत्ता आली. नगरपंचायतीमध्ये संपूर्ण सत्तातंर झाल्यानंतर राम शिंदे यांच्यासह नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी गोदड महाराज मंदिरात जाऊन तिथं दर्शन घेतलं. राम शिंदे यावेळी मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगरसेवकांसह बसले होते. त्यांची ही कृती 13 डिसेंबर 2021ची सत्ता संघर्षाची आठवण करून देणारी ठरली. त्यावेळी आणि काल देखील सोमवार होता.
जोगेश्वरवाडीच्या भाजपच्या (BJP) उमेदवार नीता कचरे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला होता. आमदार रोहित पवार यांनी प्रशासन हाताशी धरून दडपशाही मार्गानं हा अर्ज काढल्याचा आरोप करत राम शिंदे यांनी कर्जतचे ग्रामदैवत संत सद्गुरू गोदड महाराज मंदिराच्या प्रवेशद्वारावर मौनव्रत धारण करून ठिय्या दिला होता. काल सोमवारी कर्जत नगरपंचायतीमध्ये भाजपने पुन्हा सत्ता स्थापन केली.
यावेळी राम शिंदेंनी नूतन पदाधिकाऱ्यांसोबत गोदड महाराज मंदिरात जात दर्शन घेतलं. 13 डिसेंबर 2021 मध्ये सत्ता संघर्षावेळी राम शिंदे ज्या ठिकाणी ठिय्या देऊन बसले होते. त्याच ठिकाणी काल राम शिंदे नगरसेवकांना बरोबर घेऊन बसले. राम शिंदेंनी केलेली ही कृती 13 डिसेंबर 2021 ला घडलेल्या नाट्याची आठवण करून दिली. यावेळी राम शिंदेंनी नगरसेवक, कार्यकर्त्यांनी सद्गुरु गोदड महाराजांचा गजर केला.
उपनगराध्यक्ष पदासाठी बंडखोर गटनेते संतोष मेहत्रे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. पीठासन अधिकारी नितीन पाटील यांनी मेहत्रे यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केली. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा राम शिंदेंनी सत्कार केला. मुंबईमध्ये विषय समित्यांच्या निवडीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या बैठकीत राम शिंदे हजेरी लावून कर्जतमध्ये दाखल झाले. त्यांच्या या वेगवाग दौऱ्याची देखील चर्चा आहे.
उपनगराध्यक्ष निवडीसाठी आणि सत्कारासाठी राम शिंदे आवर्जून उपस्थित होते. यासाठी त्यांनी खासगी विमानाने मुंबईहून बारामती व बारामतीतून कर्जमध्ये दाखल झाले. राम शिंदेंनी यावेळी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधताना, दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा अनेक लोक आपल्याला सोडून जात आहे, त्यावर त्यांनी चिंतन करावे. गेल्या तीन वर्षात कर्जतमधील थांबलेले विकास आता गतीने करू, असं आश्वासन राम शिंदेंनी दिलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.