Jalgaon Sharad Pawar NCP Meeting, Jalgaon Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar : नाथाभाऊ, अरुण गुजराथी म्हणतात, 'राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी शरद पवारांनी लवकर निर्णय घ्यावा!'

Sharad Pawar News Demand for NCP Reunification Raised in Jalgaon: पक्ष एकत्रीकरणाबाबत अध्यक्ष शरद पवार हे जो निर्णय घेईल तो सर्वमान्य राहील. मात्र त्यांनी तो निर्णय लवकर घ्यावा अशी अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केली. 

सरकारनामा ब्यूरो

देविदास वाणी

Jalgaon Sharad Pawar NCP Meeting: उद्धव-राज ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरु असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रीकरणाचे वारे वाहू लागले आहे. याबाबत दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.

अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव येथील कार्यालयात बैठक झाली. 'शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत लवकर निर्णय घ्यावा,' असा सूर बैठकीत उमटला.

विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, आमदार एकनाथ खडसे, निरीक्षक भास्करराव काळे, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, उद्योजक श्रीराम पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महानगराध्यक्ष एजाज मलीक, महिला अध्यक्षा मंगला पाटील आदी उपस्थित होते.

गुजराथी, खडसे, चौधरींसह पदाधिकाऱ्यांनी मनोगत मांडली. 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत पवार साहेबांनी लवकर निर्णय घ्यावा,' असे ते म्हणाले. पक्ष अधिक बळकट कसा करता येईेल, यावर त्यांनी मते व्यक्त केली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका लढविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. पक्ष एकत्रीकरणाबाबत मात्र अध्यक्ष पवार हे जो निर्णय घेईल तो सर्वमान्य राहील. मात्र त्यांनी तो निर्णय लवकर घ्यावा, अशी अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केली. 

यावेळी धरणगाव, जळगाव ग्रामीण, एरंडोल, पारोळा, पाचोरा या भागातील पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त करीत शरद पवार सोबतच राहून पक्ष अधिक बळकट करू असे सांगितले.

जळगाव जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई, कर्ज माफी त्वरीत मिळावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली. आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा कार्यालयात ही बैठक झाली.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT