Sharad Pawar & Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar : साहेबांचा आदेश, मतदारसंघात जा; `एबी फॉर्म`ने वाढवली इच्छुकांची घालमेल!

Congress-NCP Candidate List: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुतांशी उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. आज घोषणा अपेक्षित.

Sampat Devgire

Maharashtra Assembly election 2024: महाविकास आघाडीच्या जागावाटप आणि बहुतांशी उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. याबाबत आज दुपारी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत तळ ठोकून असलेल्या इच्छुकांची शेवटच्या टप्प्यात चांगलीच घालमेल होत आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ काल रात्रीपर्यंत कायम होता. जागा वाटपाची चर्चा एकाच वेळी संयुक्तपणे आणि पक्षीय स्तरावर स्वतंत्रपणे केली जात होती. त्यामुळे संयुक्त चर्चेत पक्ष काही मतदारसंघ बाबत टोकाचे आग्रही होते.

ही चर्चा आणि निर्णय रखडले. आता त्यावर निर्णय झाल्याचे बोलले जाते. काँग्रेस पक्षाने 96 मतदार संघाबाबत अंतिम निर्णय घेतला आहे. त्यांच्या उमेदवारांची यादी देखील तयार आहे. या यादीवर काल नवी दिल्लीत पक्षाच्या संसदीय समितीने निर्णय दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील आपले बहुतांशी उमेदवार आणि जागावाटप निश्चित केले आहे. कालपासून वाद नसलेल्या उमेदवारांना पक्षाच्या नेत्यांनी फोन करून कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत. या उमेदवारांना आजपासून एबी फॉर्म चे वाटप केले जाईल.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात देखील अशीच स्थिती आहे. आज दुपारी तिन्ही पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटप आणि उमेदवारांविषयी निर्णय जाहीर केला जाईल. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत

यंदा उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे सर्वाधिक गर्दी होती. त्याचे कारण म्हणजे या पक्षाकडे जागा अधिक आणि विद्यमान आमदार कमी, असा विरोधाभास होता. त्यामुळे पक्षाचे कार्यालय आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृह येथे अक्षरशः इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांची जत्रा भरली होती.

या गोंधळात दिवसभर बैठकांचा धडाका चर्चा आणि इच्छुकांना प्रवेश देण्याचे काम सुरू होते. आता या धावपळीतून नेत्यांना आज उसंत मिळण्याची शक्यता आहे. बहुतांशी इच्छुकांना आता मतदारसंघात परतण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीचे महाविकास आघाडीतील चित्र आज स्पष्ट होईल अशी चिन्हे आहेत.

जळगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील विविध उमेदवारांना याबाबत प्रदेश कार्यालयाकडून सुचना देण्यात आल्या आहेत. या उमेदवारांना आज एबी फॉर्म देण्यात येणार आहेत. अन्य पक्षातील ज्यांना उमेदवारी अपेक्षीत आहे, त्यांना देखील आजच पक्षात प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT