Sujay Vikhe : बापावरून जयश्री थोरात कडाडल्या, सुजय विखेंनींही कडक शब्दांत सुनावलं; म्हणाले, "ताई ओ ताई...”

Sujay Vikhe Vs Jayshree Thorat : थोरात-विखे-पाटील यांच्यात पहिल्या पिढीपासून सुरू झालेला वाद आता तिसऱ्या पिढीपर्यंत आला आहे. जयश्री थोरात यांनी फटकारल्यानंतर सुजय विखे यांनीही उत्तर दिलं आहे.
sujay vikhe | jayashree thorat
sujay vikhe | jayashree thoratsarkarnama
Published on
Updated on

Sangamner News: खबरदार...! माझ्या बापाविषयी बोलाल, तर. संगमनेर तालुक्याकडे वाकड्या नजरेनं बघायचं नाही, असा दम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी माजी खासदार सुजय विखे-पाटील यांना भरला होता. यानिमित्तानं थोरात आणि विखे-पाटील यांची तिसरी पिढीतही कलगीतुऱ्याला सुरूवात झाली. जयश्री थोरात यांनी दम भरल्यानंतर सुजय विखे-पाटील यांनीही जशास-तसं प्रत्युत्तर दिलं आहे. ते एका मेळाव्याला संबोधित करत होते.

सुजय विखे ( Sujay Vikhe ) म्हणाले, “ताई.. ओ.. ताई... मी तुमच्या वडिलांबद्दल काहीच बोललो नाही. मी आमदारांची कार्यपद्धत, निष्क्रियतेबद्दल बोललो. 40 वर्षांपासून जो आमदार गोरगरीब जनतेच्या आयुष्याशी खेळ करत राहिला, त्याच्याबद्दल बोललो. एखादा माणूस गोरगरीबांचं रक्त पित असेल, तर त्याविरुद्ध विखे-पाटील सदैव उभा राहिल.”

“लोकशाहीत तुम्ही आम्हाला बोलायचं थांबवू शकत नाही. ताई... ओ.. ताई.. जरा ऐकायला शिका. वर्षानुवर्षे तुम्ही लोकांची तोंड दाबून ठेवले. आज हा संगमनेर तालुका गप्प बसणार नाही. तुम्ही कानात जरी कापसाचे बोळे घालते, तर आवाज तुमच्या घरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. ही परिवर्तनाची नांदी आहे. संगमनेरमधील प्रस्थापितांचा तख्ता पलटकेल्याशिवाय थांबणार नाही,” असं आव्हान सुजय विखे यांनी दिलं.

sujay vikhe | jayashree thorat
Jayashree Thorat : 'खबरदार, माझ्या बापाबद्दल बोललात'; जयश्री थोरात म्हणाल्या, 'आता शिर्डी पण जिंकणार'

“जनता ही मायबाप असते. संगमनेर तालुक्यात इतिहास पहिल्यांदा येथील राजकन्या म्हणतात, येथील जनता नाही, आमदार बाप आहे. तुम्ही गोरगरीब जनतेचा बाप काढायला निघाला आहात. हे कदापीही सहन होणार नाही. ताई.. ओ.. ताई 20 नोव्हेंबरला संगमनेरची जनता दाखवून देईल तालुक्याचा बाप जनता आहे की आमदार,” असा इशाराही विखे-पाटील यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com